भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना हा पावसामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. यानंतर १२ ऑगस्ट्पासून इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार असल्याने भारतीय संघ लंडनला रवाना झाला आहे. तर जखमी खेळाडूंचे बदली खेळाडू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ नॉटिंगहॅममध्येच विलगिरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत.
अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसआय) अध्यक्ष सौरव गांगुली हे देखील लॉर्ड्सवर होणाऱ्या कसोटी सामन्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण यूके सरकारने भारतातून प्रवाशांना इंग्लंडला येण्याची परवानगी दिली आहे.
यापूर्वी यूकेमधील प्रवाशांच्या यादीत भारत देशाचे नाव लाल यादीत (रेड लिस्ट) होते. अर्थातच भारतातून येणाऱ्या प्रवाशांना इंग्लंडमध्ये येण्याची परवानगी नव्हती. मात्र रविवारी (०९ ऑगस्ट) भारताचे नाव लाल यादीतून काढून एम्बर यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे भारत देशातील प्रवाशांसाठीचे प्रवास निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष गांगुली लॉर्ड्सवरील भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी पाहण्यासाठी मंगळवारी लंडनला रवाना होणार आहे.
एम्बर सूचीचा अर्थ असा आहे की, यापुढे कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना यूकेमध्ये आल्यानंतर १० दिवस हॉटेल क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक असणार नाही. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, गांगुलीबरोबर बीसीसीआय सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ या मालिकेदरम्यान भारतीय संघाला खेळताना पाहण्यासाठी यूकेमध्ये येण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, ‘कोणत्याही पदाधिकाऱ्याला १० दिवस विलगिकरणातमध्ये राहणे खूप कठीण होते. कारण यामुळे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकावर परिणाम होत असतो. मात्र आता इंग्लंडमधील प्रवासाच्या नियमांमध्ये विशेषत: विलगिकरणाबाबत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आमचे अधिकारी त्यांना हवे असल्यास तेथे जाऊ शकतात.’
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमध्ये ‘लेडी सेहवाग’चा डंका! २२ चेंडूत ठोकलं अर्धशतक, सर्वोच्च भागिदारीचाही केला विक्रम
‘आतापर्यंत २ आयपीएल फ्रँचायझींचा कॉल आला आहे,’ भारताविरुद्ध चमकलेल्या श्रीलंकन खेळाडूचा खुलासा