रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. भारताने या रोमहर्षक सामन्यात 4 विकेट्स राखून विजय मिळवला. पण आसामच्या शिवसागर जिल्यातील अमन नावाच्या एका चाहत्याने हा सामना पाहाताना शेवटचा श्वास घेतला. या चाहतेला परिसरातील सर्वजण बिट्टू गोगोई या नावाने ओळखात, असे समोर येत आहे. बिट्टू 34 वर्षांचा होता.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळला. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर या दोन संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. भारताच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी संघासाठी महत्वपूर्ण धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी गोलंदाजीत करताना कमाल दाखवली.
बिट्टू गोगोई रविवारी रात्री भारत आणि पाकिस्तान यांची टी-20 लढत पाहण्यासाठी एका स्थानिक चित्रपटगृहात गेला होता. याठिकाणी हा सामना लाईव्ह दाखवला जात होता. पण सामना सुरू असताना त्याठिकाणी मोठा आवाज देखील सोडला होता. अशात सामना सुरू असतानाच गोगोई अचानक बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला. त्याचे मित्र देखील यावेळी बिट्टूसोबत होते. या सर्वांनी बेशुद्ध अवस्थेतील बिट्टूला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने याविषयी सविस्तर माहिती दिली. डोक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट सामना सुरू असताना त्याठिकाणी ध्वनीप्रदुषण मोठ्या प्रमाणात सुरू होते. याच कारणास्तव त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि जीव देखील गमवावा लागला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर भारताच्या विजयात सर्वात महत्वाचे योगदान विराट कोहलीने दिले. विरानटे 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. या वादळी खेळीसाठी विराटला सामनावीर देखील निवडले गेले. विराटव्यतिरिक्त हार्दिक पंड्याने देखील महत्वाच्या 40 धावा कुटल्या. तत्पूर्वी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरा भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाली, पण मध्यक्रमात विराट आणि हार्दिकने संघाचा डाव सांभाळला. गोलंदाजांमध्ये अर्शदीप आणि हार्दिकने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सेहवागने चोळलं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ! व्हिडिओ शेयर करत म्हणाला, ‘आमच्याकडे फटाके तर तुमच्याकडे..’
T20 World Cup: सावधान, भारत-पाकिस्तान! बांगलादेशचा नेदरलॅंड्सवर निसटता विजय