भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने राष्टीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची जागा राहुल द्रविड घेणार असा अंदाज लावला जात होता. आता त्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविडचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर इच्छुकांचे अर्ज मागवले होते.
नवीन नियमांनुसार या पदाच्या करारामध्ये विस्तार होऊ शकत नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.
बीसीसीआयच्या एका सुत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या माहितीप्रमाने, “राहुल द्रविडने एनसीए प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. वास्तवात सेंटर ऑफ एक्सीलेंस बनलेल्या एनसीएचा चेहरा बदलण्यासाठी त्याने उत्कृष्ट काम केले आहे. ते पाहता हे तो पदावर कायम राहील, जे जवळजवळ निश्चित आहे. त्यातही राहुलशिवाय कोणत्याच मोठ्या नावाने या पदासाठी अर्ज केलेला नाही.”
अशी माहिती मिळाली आहे की बीसीसीआयने अर्ज दाखल करण्याच्या तारखेत काही दिवसांची वाढ केली आहे. ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ भेटेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, “बीसीसीआयने पदाधिकाऱ्यांची वेळेची सीमा १५ ऑगस्टपासून काही दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा राहुल द्रविड शर्यतीत आहे तेव्हा सर्वांनाच माहिती आहे की, या पदासाठी अर्ज करण्याला जास्त अर्थ नाही. त्यामुळे इतर इच्छुंकांचा अर्ज मागवणे हे फक्त औपचारिकतेसारखे आहे. पण, हा निर्णय निष्पक्ष होण्यासाठी आणखीन काही दिवस दिले गेले आहेत. जर कोणाला वाटत असेल तर तो अर्ज दाखल करू शकतो.”
द्रविड भारतीय संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होणार अशी होती चर्चा
भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यानंतर द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेणार असल्याची चर्चा होती. पण त्याने केलेल्या अर्जाने या गोष्टीची पुष्टी केली आहे की तो आत्ताही भारताच्या युवा क्रिकेटपटूंसोबत काम करून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला मदत करू इच्छितो.
यादरम्यान दुखापतीशी लढणारा वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी पुन्हा एकदा एनसीएमध्ये पोहोचले आहेत. शुभमन गिलही एनसीएमध्येच आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे हे तीन खेळाडू रिहॅबिलीटेशन आणि फिटनेस परीक्षणाला सामोरे जातील. त्याच्याच आधारे हे निश्चित केले जाईल की, हे खेळाडू आयपीएल खेळतील की नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; स्मिथ-फिंचचे पुनरागमन तर, ‘हा’ नवा शिलेदारही सहभागी
लॉर्ड्सवरील विजयानंतर विरुष्काचा लंडनमध्ये ‘वेजिटेरियन लंच’; एका व्यक्तीला सर्वांनी केले खूप मिस
‘…तर त्याने कधी-कधी असा पंगा घ्यायला हवा’, झहीर खानचा बुमराहला खास सल्ला






