आशिया चषकात भारत अणि पाकिस्तान या दोन संघात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच आपला संघ जाहीर केला होता. यात दुखापतीपासुन पुनरागमन करण्याऱ्या केएल राहुलचेही नाव होते. परंतु, तो अजूनही बरा झाला नसल्याने संघात ईशान किशनला संधी मिळली आहे. पण तो कोणत्या क्रमावर फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. यातच भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जफर याने यावर मोठे वक्तव्य केले आहे.
राहुल आशिया चषकाचे पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत माजी फलंदाज वसीम जफर (Wasim Jaffer) ने त्याच्या प्लेइंग 11 मध्ये ईशान किशन (Ishan Kishan) ची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. ईशान हा सलामीला फलंदाजी करणारा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत वसीम जाफरने ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’वर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगितले. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत ईशानला सलामीचा जोडीदार म्हणून निवडले. यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवून विराट कोहली (Virat kohli) आणि अय्यरच्या फलंदाजीत बदल करण्यात आले.
भारताचा माज फलंदाज जफर म्हणाला, “जर मला टॉप-4 निवडायचे असेल तर मी रोहित आणि ईशानच्या सलामीसह जाईन. तिसर्या क्रमांकावर गिल आणि चौथ्या क्रमांकावर कोहली. श्रेयस पाच, हार्दिक सहा आणि जडेजा सात धावांवर. तुम्हाला तीन सर्वोत्तम सीमर्स खेळायचे असले तरीही मी फलंदाजी वाढवण्यासाठी शार्दुलसोबत जाईन. पण सिराज बुमराह आणि हार्दिकच्या गोलंदाजीमुळे तुमचा पाया मजबूत आहे. मला सातव्या क्रमांकावर फलंदाजी संपवायची नाही. शार्दुल चांगला फलंदाज असून विकेट घेतो. त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे.”
वसीम जफरने पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचील निवडलेली प्लेइंग-11
रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. (indian cricket team batsman wasim jaffer said ishan kishan play as openr and virat should play at no4)
महत्वाच्या बातम्या-
जाळ अन् धूर संगटच! मार्शच्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेने गमावली मालिका
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 15: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा