मुंबई । भारतीय क्रिकेट संघाच्या निळ्या जर्सीवर गेल्या चौदा वर्षांपासून एक चिन्ह होते. विराट,धोनी, रोहित जेव्हा मैदानावर उतरायचे तेव्हा त्यांच्या जर्सीवर ते चिन्ह नेहमीच चमकत राहायचे. हे चिन्ह म्हणजे नायकी कंपनीचा लोगो. मात्र, आता 14 वर्षांनंतर जर्सीवरील हा लोगो हटू शकतो. नाइकी ही कंपनी बीसीसीआयची कीट पार्टनर आहे. बीसीसीय आणि नाइकी यांच्यात झालेल्या करारात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आता अडचणी निर्माण झाल्या आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि नाइकी यांच्यात करारावरून वाद झाला आहे. नाइकीचा बीसीसीआय सोबतचा करार सप्टेंबरमध्ये संपणार आहे. नाइकीने चार वर्षांचा करार करत 370 कोटी रुपये दिले होते. यातील 85 लाख रुपये मॅच फी होती आणि 12-15 कोटी रुपये रॉयल्टी देखील सामील होतील.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक सामने रद्द करण्यात आले आहे. परिणामी नाइकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाइकच्या मते, बीसीसीआयने त्यांचा करार वाढवून द्यावा. मात्र, बीसीसीआय तो करार वाढविण्यास तयार नाही. ते नवे टेंडर काढण्याच्या तयारीत आहेत.
लॉकडाऊनमुळे भारतीय संघाचे 12 आंतरराष्ट्रीय सामने रद्द झाले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका त्यासोबतच भारताचा श्रीलंका दौरा आणि झिम्बाब्वेविरुद्धची मालिका देखील रद्द करण्यात आली.
करारानुसार, नाइकी कंपनी खेळाडूंना जर्सी, बूट, अन्य नाइकीच्या वस्तू मोफत देत होती. त्यामुळे नाइकीचा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर दिसून येत होता. नाइकी आणि बीसीसीआय यांच्यात 2006 साली पहिल्यांदा करार झाला होता, तेव्हापासून ही कंपनी भारतीय संघाला जर्सी आणि बूट पुरविण्याचे काम करत होते. आता दोघांतील संबंध बिघडले आहेत.
काही रिपोर्टनुसार, बीसीसीआय नाइकी या कंपनीला कोणतीच सवलत देण्याच्या तयारीत नसल्याची माहिती आहे. बीसीसीआयने कंपनीची अडचण समजून घेतली पाहिजे. कारण बाजारात अशी पहिल्यांदाच स्थिती निर्माण झाली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
रोहितचा सराव करणं या लोकांना आवडलं नाही, राज्य सरकारला केली अपिल
पुजारा विरुद्ध भारतीय संघात रचला जातो कट, संघाबाहेर असलेल्या खेळाडूने केला खुलासा
विंडीजच्या गोलंदाजांचं यश डोळ्यात खुपल्याने ‘बाउन्सर’ नियम; विंडीजच्या माजी खेळाडूचा दावा