---Advertisement---

मोठी बातमी! रिषभ पंत पाठोपाठ भारतीय संघातील ‘हा’ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचे सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समजत आहे. नुकतेच गुरुवारी(१५ जुलै) सकाळी युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले होते. आता भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार भारतीय संघाचे थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यासह आणखी २ सदस्य आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आयसोलेशनमध्ये असलेले सपोर्ट स्टाफमधील सदस्य आणि पंत अन्य भारतीय संघासह डरहॅमला गेलेले नाही.

यापूर्वी एका वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले होते की इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या खेळाडूंपैकी एकाचा कोरोना अहवाल ८ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. पण तो भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात नसल्याने बाकी कोणाला धोका नाही. पण त्यांनी खेळाडूचे नाव उघड करण्यास नकार दिला.

तसेच त्यांनी सांगितले की सचिव जय शहा यांनी भारतीय संघव्यवस्थापनाला पत्र लिहून सर्वांना कोविड नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की सर्व काळजी घेतली जात असून सर्वांना १ महिन्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर बायोबबलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तसेच ते असेही म्हणाले की प्रत्येकाला सातत्याने बायोबबलमध्ये ठेवू शतक नाही. याबरोबरच भारतीय संघातील अन्य खेळाडू ठिक असल्याने ते डरहॅमला रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय संघाला सुटी महागात
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर आल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघातील सदस्यांना ताजातवाना होण्यासाठी साधारण ३ आठवड्यांची सुटी दिली होती. ही सुटी भारतीय संघासाठी महागात पडत असल्याचे दिसत आहे.

भारतीय संघाचे डरहॅमला सराव शिबिर
जवळपास ३ आठवड्यांच्या सुटीनंतर भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी डरहॅम येथे आले आहेत. भारतीय संघ डरहॅम येथे सराव शिबिर पूर्ण करुन आणि सराव सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी नॉटिंगघमला रवाना होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

गर्विष्ठ असल्याची सातत्याने टीका होणाऱ्या विराटनेच मैदानात घुसलेल्या चाहत्यासाठी दाखवली माणुसकी, व्हिडिओ व्हायरल

यांचं वेगळंच! सहकाऱ्याने झेल पकडूनही पाकिस्तानी यष्टीरक्षक नाखूश, भर मैदानात घातला वाद

रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी ऐकताच रैना, हरभजन सिंगने दिली अशी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---