---Advertisement---

सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 6:24 PM
---Advertisement---

७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना आज अनिर्णीत अवस्थेत संपला. सामन्यातील बहुतांश सत्रांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवले. मात्र शेवटच्या दिवशी भारतीय संघाने जिगरबाज वृत्ती दाखवत सामना वाचवण्यात यश मिळवले.

या सामन्यात भारतीय संघाला चौथ्या डावात ४०७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सामना जिंकण्यासाठी त्यांना या धावा करणे किंवा अनिर्णीत राखण्यासाठी १३२ षटके खेळून काढणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ भारताला सर्वबाद करून हा सामना खिशात टाकेल, असेच सगळ्यांना वाटले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी लढाऊ वृत्तीने ही षटके खेळून काढत हा सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे या सामन्यानंतर संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण होते.

भारतीय क्रिकेट संघाने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ड्रेसिंग रूम मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य एकमेकांचे अभिनंदन करताना दिसून येत आहेत. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर यात समाधान दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CJ5owsBAb6k/

दरम्यान, हा सामना अनिर्णीत राहिल्याने मालिकेतील १-१ अशी बरोबरी कायम आहे. आता मालिकेतील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

पेनच्या बडबडीला अश्विनचे सडेतोड उत्तर! चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

ब्रेकिंग! विराट कोहली बनला बापमाणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म

हा निकाल पचवणे अवघड, सिडनी कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---