---Advertisement---

आहा कडकच ना! मैदानावर चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पंड्या बनलाय कूक, वहिनींनी शेअर केला व्हिडिओ

On: बुधवार, मे 5, 2021 6:09 PM
---Advertisement---

अखेर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, सध्या मात्र सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत हॉटेलच्या एका खोलीत राहत आहेत. यादरम्यान अनेक खेळाडू वेळ घालवण्यासाठी काही तरी मजेशीर गोष्टी करतात व त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत असतात. असाच एक व्हिडिओ हार्दिक पंड्याची वहिनी पंखुडीने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हार्दिक नूडल्स बनवताना दिसत आहे.

पंखुडीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक काळ्या रंगाचा बाथ रोब घालून नूडल्स बनवत आहे. हार्दिकचा हा अवतार चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात पसंत पडला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Screengrab: Instagram/PankhuriSharmaPandya

पंड्या कुटुंबातील सर्वच सदस्य नेहमीच आपल्या कुटुंबाचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच हार्दिकने डान्सचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये स्वतः हार्दिक, त्याची पत्नी नताशा तसेच कृणाल व त्याची पत्नी पंखुडी हे डान्स करताना दिसत होते. चाहत्यांनी त्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात पसंत केले होते.

https://www.instagram.com/p/CNz5IDaljDQ/

दरम्यान, आयपीएल 2021 चा विचार केला असता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेकांनी चिंता व नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आगामी काळात आयपीएल स्पर्धा केव्हा सुरू होते, तसेच तिचे स्वरूप कशा प्रकारचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या ‘या’ सामन्यादरम्यान खोटी ओळख दाखवत मैदानात खुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ सट्टेबाजांना अटक

वी विल बी बॅक! आयपीएल १४ स्थगित झाल्याने ‘या’ संघांना सर्वाधिक फायदा, करणार जोरदार पुनरागमन?

बाय बाय इंडिया! आयपीएलच्या स्थगितीनंतर इग्लंडचे ‘हे’ ८ खेळाडू परतले मायदेशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---