भारतात क्रिकेटप्रेमींचा मोठा चाहतावर्ग आहे. क्रिकेट पाहणाऱ्यांबरोबरच मैदानात उतरुन क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही भारतात मोठी आहे. यांपैकी सर्व क्रिकेटपटूंचे एक दिवस भारतासाठी खेळण्याचे स्वप्न असते. परंतु आयपीएल आल्यापासून अनेक खेळाडूंसाठी इतर पर्यायही उपलब्ध झाले आहेत. अनेकांनी आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात जागाही मिळवली आहे. मात्र, असे असूनही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळत नाही. या कारणास्तव यातील काही खेळाडू चांगल्या संधीच्या शोधात परदेशात स्थायिक होतात आणि त्यांच्यासाठीच खेळू लागतात. तिथे फारशी स्पर्धा नसल्याने त्यांना संधीही मिळते.
भारतातील अशाच एका युवा क्रिकेटपटूला अमेरिकेत कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. इयान देव सिंग चौहान असे या क्रिकेटपटूचे नाव असून तो आता यूएसएच्या मायनर लीगचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
इयान देव सिंग चौहान हा जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार आहे
जर आपण इयान देव सिंह चौहानबद्दल बोललो तर तो भारतातील जम्मू-काश्मीरसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असायचा. त्याने जम्मू-काश्मीरचे कर्णधारपदही भूषवले आहे. त्याची आता मायनर लीग क्रिकेटमध्ये सिएटल थंडरबॉल्ट्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली.
View this post on Instagram
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिएटल थंडरबॉल्ट्सनेही एका माजी भारतीय खेळाडूला त्यांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या पॉल वल्याती या खेळाडूची सिएटलने प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता एका भारतीयाला कर्णधार बनवण्यात आले आहे. जर आपण इयान देव सिंग चौहानबद्दल बोललो तर तो अंडर-19 राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताकडून खेळला आहे.
इयान देव सिंगने आपल्या कारकिर्दीत एकूण 93 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 72 लिस्ट ए आणि 48 टी20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीत त्याच्या नावावर 5 हजारांहून अधिक धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवनप्रमाणेच ‘या’ 5 भारतीय खेळाडूंनाही फेअरवेल मॅच खेळण्याची मिळाली नाही संधी
बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया