भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटने जगावर दीर्घकाळ दबदबा निर्माण केला. मात्र, त्यांच्या चमकदार कामगिरीच्या विपरीत त्यांना भारतीय संघाकडून निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
आज आम्ही तुम्हाला अशा 5 भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी निवृत्तीचा सामना न खेळता अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला किंवा दीर्घकाळ राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेटला अलविदा केला.
या 5 भारतीय खेळाडूंनी आपला निरोप सामना खेळला नाही
5. सुरेश रैना
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने 2018 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. रैनाने अचानक एका सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी रैनाला अखेरचा निरोप म्हणून मैदानात उतरण्याची विनंती केली. सुरेश रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत.
4. वीरेंद्र सेहवाग
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. मात्र, या काळात सेहवागने जवळपास 2 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवले, परंतु राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्याने वीरेंद्र सेहवागने 2015 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
3. युवराज सिंग
2007 टी20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदाचा हिरो असलेल्या युवराज सिंगलाही आपला निरोप सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या काळात युवराज सिंगची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर त्याने कर्करोगाचा पराभव करून जबरदस्त पुनरागमन केले, परंतु 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर युवराजने अखेर 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
2. एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एमएस धोनीची क्रिकेट कारकीर्द विजेतेपदांनी भरलेली होती. कर्णधार म्हणून धोनीने 2007 टी20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान धोनीने भारतासाठी शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 2019 वनडे विश्वचषक उपांत्य फेरीत खेळला. यानंतर धोनी भारतीय संघात परतला नाही आणि त्याने 2020 मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
1. शिखर धवन
24 ऑगस्ट 2024 रोजी शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर करून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शिखर धवनने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला. मात्र, धवनलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निरोपाचा सामना खेळायला मिळाला नाही, याचे त्याच्या चाहत्यांना खूप दुःख असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य