KL Rahul :- भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुलने ‘कॉफी विथ करण’च्या त्या एपिसोडची आठवण काढली. ज्या एपिसोडमुळे बराच वाद झालेला आणि त्याला निलंबनालाही सामोरे जावे लागलेले. राहुलने खुलासा केला की, या मुलाखतीमुळे तो खूप घाबरला होता. राहुलने 2019 मध्ये हार्दिक पंड्यासोबत या कार्यक्रमात भाग घेतला होता. मात्र, यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी काही अशा कमेंट्स केल्या होत्या, ज्यामुळे बराच वाद झालेला आणि त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.
हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर आणि वाद वाढल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हार्दिक आणि राहुलला निलंबित केले होते. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात असताना हा भाग प्रसारित करण्यात आलेला. त्यानंतर त्यांना दौऱ्याच्या मध्यातूनच मायदेशी परतावे लागले होते. यूट्यूबवर एका पॉडकास्ट दरम्यान राहुलने या वादावर आपले मत व्यक्त केले. तसेच, त्या मुलाखतीने तो पूर्णपणे बदलल्याचे सांगितले.
राहुल म्हणाला की, भारताकडून खेळल्यानंतर त्याच आत्मविश्वास वाढला होता. परंतु त्या मुलाखतीचा त्याच्यावर खूप प्रभाव पडला. या भारतीय फलंदाजाने सांगितले की, “मला कधीही निलंबित करण्यात आले नव्हते. शालेय जीवनातही माझ्यासोबत असे काही घडले नव्हते. मी त्या करायचं मात्र कधी पालकांपर्यंत ही गोष्ट दिली नव्हती. या परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे मला माहीत नव्हते. मी ट्रोलिंग सहन करतो आणि मी अशा गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही. त्यावेळी मला खूप ट्रोल केले जात होते. माझ्या कृतीमुळे मला ट्रोल केले जात होते. त्या मुलाखतीने माझे जग बदलून टाकले. त्याने मी पूर्णपणे बदललो. मी खूप संयम दाखवला. त्यानंतर मी भारतासाठी खेळलो आणि त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला.”
राहुल सध्या दुलिप ट्रॉफीसाठी तयारी करत असून, पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड होण्याची आशा आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात तो नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ स्टार खेळाडूनं झळकावलं शानदार शतक
6,6,6,6….निकोलस पूरनचा कहर! षटकारांच्या बाबतीत सूर्या, बटलरला मागे टाकलं
आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म