भारतीय संघ मागील काही काळापासून गोलंदाजी विभागामुळे चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे ईशांत शर्मा याला वाढत्या वयामुळे संधी मिळत नाहीये, तर दुसरीकडे, हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आपल्या दुखापतीमुळे दीर्घ काळापासून मैदानाबाहेर आहे. पुढील महिन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. यासाठी बीसीसीआयने नुकतेच कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली. या दौऱ्यातून उमेश यादव याला वगळण्यात आले. तसेच, मोहम्मद शमी याच्या जागी मोहम्मद सिराज याला कसोटी आणि वनडेत स्थान मिळाले आहे. अशातच 3 वेगवान गोलंदाजांना भारतीय संघाचे भविष्य सांगत ईशांत शर्माने मोठे भाष्य केले आहे.
ईशांतने ‘या’ 3 खेळाडूंना म्हटले भारताचे भविष्य
खरं तर, भारतीय संघव्यवस्थापनाला सध्या नवीन पिढीच्या वेगवान गोलंदाजांना तयार करण्यात समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) याने नुकतेच याविषयी आपले मत मांडले. त्याने सांगितले की, भविष्यात संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व कोण करू शकते.
एका युट्यूब चॅनेलच्या पॉडकास्टदरम्यान ईशांतने तीन वेगवान गोलंदाजांचे नाव घेतले. यांच्याकडून आशा आहे की, जर या गोलंदाजांना योग्यप्रकारे मार्गदर्शन केले गेले, तर ते भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी छाप पाडू शकतात.
ईशांत म्हणाला की, “जर तुम्ही त्यांना संधी दिली, तर उमरान मलिक याच्याकडे ती क्षमता आहे की, तो दीर्घकाळ भारतासाठी चांगले प्रदर्शन करू शकतो. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग याच्याकडे प्रतिभेची कमतरता नाहीये.” ईशांतने याव्यतिरिक्त मुकेश कुमार (Mukesh Kumar) याचेही नाव घेतले, जो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. विशेष म्हणजे, ईशांतही याच संघाचा भाग आहे.
ईशांत पुढे म्हणाला की, “अधिक लोकांना मुकेशबद्दल माहिती नाहीये, पण मी त्याच्यापेक्षा जास्त सामान्य व्यक्ती पाहिला नाही. जर तुम्ही त्याला म्हणाल की, असा चेंडू टाकायचा आहे, तर तो तसेच करून दाखवेल. आयपीएलमध्ये त्याने अनेक धावा खर्च केल्या, पण त्याने अनेक महत्त्वाची षटकेही टाकली होती. कुणाला स्थिती समजत नाही की, गोलंदाज कशा षटकात चेंडू टाकत आहे आणि कशा फलंदाजासमोर चेंडू फेकत आहे. लोकांना फक्त आठवते की, त्याने 4 षटकात 50 धावा खर्च केल्या होत्या.”
खरं तर, मुकेश कुमार याला वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे अशा दोन्ही संघात संधी मिळाली आहे. तसेच, अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांना कसोटीत निवडले नाहीये. त्यांना वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. (indian cricketer ishant sharmas statement on team india s bowling attack read here)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, असं कुणासोबतच होऊ नये! बॉलरने ज्या सामन्यात घेतलेली हॅट्रिक, त्यातच पडले एका ओव्हरमध्ये 6 सिक्स
महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत स्मृती मंधानाच्या ब्लू संघाची विजयी सलामी, शिवाली ठरली ‘POM’ पुरस्काराची मानकरी