---Advertisement---

डीएसपी मोहम्मद सिराज या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, डेटिंगच्या चर्चांना उधाण!

---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. दरम्यान आता सिराजच्या डेटिंगबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. असा दावा केला जात आहे की सिराज बिग बॉस 13 फेम अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करत आहे. सिराज अलीकडेच आशा भोसले यांची नात जनाई भोसलेच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता. सिराज आणि जनाईबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. यानंतर दोघांनीही भाऊ-बहिणीच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, सिराज आणि माहिरा एकमेकांना डेट करत आहेत. रिपोर्टनुसार, दोघांची भेट गेल्या नोव्हेंबरमध्ये झाली होती. सिराजने माहिराची एक पोस्ट लाईक केली होती. यानंतर, त्यांच्या डेटिंगच्या अफवा अधिकच वाढल्या. मात्र, दोघांनीही अद्याप इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो केलेले नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणावर माहिरा किंवा सिराजकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीत सिराजनेही हजेरी लावलेली. यावेळी बॉलिवूडशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते. यानंतर सिराज आणि जनाईबद्दल अफवा पसरल्या. पण दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या भावा-बहिणीच्या नात्याची पुष्टी केली होती. आता माहिराबद्दल एक अफवा पसरली आहे. माहिराच्या चाहत्यांनी सिराजच्या नावाबाबत सोशल मीडियावर अनेक कमेंट केल्या आहेत. या प्रकरणाची अधिकृत पुष्टी सिराजकडून अद्याप आलेली नाही.

माहिरा शर्मा अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तिने नागिन, बिग बॉस 13 आणि कुंडली भाग्य मध्ये काम केले आहे. सिराज आणि माहिरा यांची भेट कशी झाली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. पण रिपोर्ट्सनुसार, दोघेही नोव्हेंबर 2024 पासून एकमेकांना ओळखतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Sharma (@mahirasharma)

हेही वाचा-

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा भारतीय खेळाडू रणजी सामना खेळणार, फिटनेसवर असणार नजरा
SL VS AUS: स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, दिग्गज गावस्करांचा महान विक्रम मोडीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---