कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या झालेल्या अत्याचारानंतर देशातील अनेक भागांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अनेक क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या. भारताचा टी20 कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवनंही (Suryakumar Yadav) कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर मुलांना शिकवण्याचा सल्ला त्यानं दिला.
सूर्यकुमारनं त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं प्रथम लिहिलं की, “आपल्या मुलींची काळजी घ्या. आपल्या मुलांना शिक्षित करा. तुमचे भाऊ, तुमचे वडील, तुमचे पती आणि तुमच्या मित्रांना शिक्षित करा.” सूर्यापूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनंही (Mohammed Siraj) प्रतिक्रिया दिली होती. कोलकाता प्रकरणावर त्यानं संताप व्यक्त केला होता.
सूर्यकुमार यादव लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. भारतासाठीही त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. सूर्याने भारतासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. त्यानं 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सूर्याने या फॉरमॅटमध्ये 773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 4 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानं भारतासाठी 71 टी20 सामन्यात 2,432 धावा केल्या आहेत, तर त्यानं 4 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. सूर्यानं 150 आयपीएल सामन्यात 3,594 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: खणखणीत षटकार ठोकून किशनने संघाला मिळवून दिला शानदार विजय…!
धोनी, कोहली की रोहित सर्वोत्तम कर्णधार कोण? बुमराहनं केला मोठा खुलासा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण