भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा यशस्वी राहिला. उभय संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका शनिवारी (24 सप्टेंबर) संपली. भारतीय संघाने ही मालिका इंग्लंडला व्हाईट वॉश देत आपल्या नावे केली. दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. या संपूर्ण घडामोडीत एक धक्कादायक घटना घडली. भारतीय संघाची यष्टीरक्षक तानिया भाटिया हिच्या हॉटेल रूममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. स्वतः तानियाने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
https://twitter.com/IamTaniyaBhatia/status/1574366656008429569?t=yY0E3J1irQFa35Zstn_omg&s=19
भारतीय संघ अद्याप इंग्लंडमध्ये आहे. आपल्या रूममध्ये चोरी झाल्याची पोस्ट तानियाने केली. तिने लिहीले,
‘मॅरीएट हॉटेल लंडन यांच्या एकूणच व्यवस्थापनामूळे मला धक्का बसला आहे तशीच मी नाराजही झाली आहे. कोणीतरी माझ्या रूममध्ये येतो आणि माझ्या बॅगमधील रोख रक्कम, कार्ड्स आणि माझे दागिने चोरून नेतो. मॅरिएट हॉटेल खूपच असुरक्षित आहे. आशा करते की, लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी होईल आणि यावर कारवाई केली जाईल. सुरक्षेची खूपच खराब व्यवस्था. इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुढील काळात याबाबत काळजी घेईल.’
तानिया भाटिया भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर होती. मात्र, तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या दौऱ्यावर तीन टी20 व तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली. टी20 मालिकेत भारतीय संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 3-0 असा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर






