भारतीय खेळाडू जेवढे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यातही सर्वाधिक चर्चा त्यांच्या लव्ह लाईफची होते. सध्या भारतीय क्रिकेटविश्वात लग्नाचा हंगाम सुरू आहे. नुकतेच भारतीय फलंदाज केएल राहुल याने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत संसार थाटला होता. आता त्याच्या पाठोपाठ अष्टपैलू अक्षर पटेल यानेही त्याच्या मैत्रिणीसोबत सात फेरे मारण्यासाठी न्यूझीलंड मालिकेतून स्वत:ला दूर ठेवले. यांच्याव्यतिरिक्त भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याची लव्हस्टोरीही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्याची लव्हस्टोरी ही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. चला तर जाणून घेऊयात…
उमेश यादव (Umesh Yadav) याच्या नात्याने मैत्री ते लग्न असा प्रवास केला. त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. अगदी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्याप्रमाणेच त्याने त्याचे प्रेम मिळवण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी संघर्ष केला होता.
भारतीय संघात (Indian Team) जबरदस्त खेळाडूंपैकी एक मानला जाणारा उमेश यादव याला फार संधी मिळतात. मात्र, निवडकर्त्यांनी या खेळाडूवर जेव्हा-जेव्हा विश्वास दाखवला, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यावर त्याने कसोटीत सामन्यात आपले कौशल्य दाखवून दिले. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव हा व्यावसायिक क्रिकेटपटू आणि खूप रोमँटिक व्यक्ती आहे. भारतीय संघातील जोडप्यांचे उदाहरण देताना त्यांचे नाव पहिले घेतले जाते. शाहरुखने रील लाईफमध्ये जे काम ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये (Dilwale Wale Dulhaniya Le Jayenge) काजोलसाठी (Kajol) केले, तेच काम खऱ्या आयुष्यात उमेश यादवने केले.
उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा (Tanya Wadhwa) ही फॅशन डिझायनर (Fashion Designer) आहे. दोघांनीही आपले प्रेमसंबंध लग्नापर्यंत नेण्यासाठी खूप संघर्ष केला. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तान्या उमेशला आयपीएल (IPL) पार्टीत भेटली होती. तान्या 2010 मध्ये उमेशला भेटली होती. त्यावेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) (Delhi Capitals) संघाचा भाग होता. तान्या तेव्हा फॅशन डिझायनिंगची विद्यार्थीनी होती आणि तिच्या मित्राने तिची उमेशशी ओळख करून दिली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर तान्याने उमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तान्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते की, ती उमेशच्या साधेपणा आणि नम्र स्वभावाच्या प्रेमात पडली. दोघेही 29 मे, 2013 रोजी लग्न बंधानात अडकले.
https://www.instagram.com/p/CQx3mK3reUR/
उमेश यादवची पत्नी तान्या हिचा जन्म पंजाबी-हिंदू कुटुंबात झाला. भारतीय संघातील हा वेगवान गोलंदाज तान्याच्या कुटुंबीयांनाही आवडला होता. मात्र, वेगवेगळ्या समाजातील असल्यामुळे ते त्यांच्या लग्नाला परवानगी देत नव्हते. बराच वेळ तान्या आणि उमेशने दोन्ही कुटुंबांची समजूत घातली. हे बराच काळ चालले आणि अखेर प्रेमाचाच विजय झाला. उमेश आणि तान्या हे एका मुलीचे आई-वडील आहेत. (indian cricketer umesh yadav and stylist Tanya Wadhwa love story like Hindi cinema dilwale wale dulhaniya le jayenge)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपच्या आधीच इंग्लंडची ताकद झाली कमी, चॅम्पियन खेळाडूशिवाय स्पर्धेत उतरणार बटलर सेना
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! घातक इंग्लिश गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन