---Advertisement---

विराटचा कसोटी संघनायक पदाचा राजीनामा; पण ‘हे’ आकडे पाहून म्हणाल, ‘भाऊ थोडी घाई केलीस’

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 7:32 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा (Virat Kohli Steps Down As Test Captaincy) निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून गेले ७ वर्षे तो कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळत होता. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर त्याचा हा निर्णय सर्वांसमोर आला आहे.

२०१५ साली कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे हाती घेणाऱ्या विराटने भारतीय संघाला या स्वरुपात अनेक विलक्षण विजय मिळवून दिले आहेत. त्याचे सेना देशातील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) आकडेही (Virat Kohli’s Test Captaincy Record) इतर भारतीय कसोटी कर्णधारांच्या तुलनेत खूप चांगले आहेत.

व्हिडिओ पाहा-

कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही... बोलतोय 'किंग कोहली' । Virat Kohli Press Conference

विराट ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. २०१८-१९ साली भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चारली होती. तसेच तो भारतीय संघाचे फायनल फ्रँटियर असलेल्या दक्षिण आफ्रिकेत २ कसोटी सामने जिंकणारा पहिलावहिला भारतीय कर्णधार आहे. याचबरोबर इंग्लंडच्या भूमीत ३ कसोटी सामने जिंकणाराही तो पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

विराटच्या आजवरच्या कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने तब्बल ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. यातील सर्वाधिक ४० सामन्यात त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने फक्त १७ कसोटी सामने गमावले आहेत. उर्वरित ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहे. यासह तो कसोटीतील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा- बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा

विराटनंतर फक्त एमएस धोनी याने ६० किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु धोनी कसोटी कर्णधार म्हणून विराटइतका यशस्वी होऊ शकला नाही. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली ६० कसोटी सामने खेळताना भारताला केवळ २७ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने १८ कसोटी सामने गमावले आहेत व १५ अनिर्णित राखले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा

फिरकीपटू नॅथन लायनने भल्याभल्या फलंदाजांना सोडले मागे, दिवस-रात्र कसोटीत षटकारांचा केला भीमपराक्रम

ब्रॉड बनला ‘अव्वल नंबरी’! ऍशेस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले स्वतःचे नाव

हेही पाहा-

त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट| Virat's First Century And Gambhir's Gift

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---