भारतात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू आहे. क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. पश्चिम बंगाल मध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने तृणमुल काँग्रेस पक्षाकडून शिवपुरमध्ये विजय मिळवला आहे. यानंतर त्याने राजकारण क्षेत्र निवडण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवपुर मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या तिवारीने ३२३३९ मतांनी विजय मिळवला आहे. त्याने भाजपाच्या डॉ. रतिन चक्रवर्ती यांना पराभूत करत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.
यानंतर न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना तो म्हणाला की, “माझ्या विभागात कोविड-१९ महामारीवर मात करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे, नागरिकांमधील जागृतता वाढवणे आणि सर्वांना सुरक्षित ठेवणे या गोष्टींना मी अधिक प्राधान्य देईन. आता हेच माझ्यापुढील आव्हान असेल.”
“मी निवडणूकीसाठी पूर्णपणे तयार होतो आणि मी विजयासाठी कठोर मेहनत केली होती. मला माहिती आहे की, राजकारण सोपे काम नाही. त्यातही एका वेगळ्या क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केल्या नव्या व्यक्तीपुढे तर खूप अडचणी येतात. मी शिवपुरमध्ये घरोघरी जात प्रचार केला होता. त्यामुळे शिवपुरमधील रहिवास्यांना माझ्या हेतूची जाणीव होती,” असे त्याने पुढे सांगितले.
“दीदी (ममता बॅनर्जीः माझ्या प्रेरणास्त्रोत राहिल्या आहेत. मी पहिल्यांदा जेव्हा दीदींशी बोललो, तेव्हा दुखापतीमुळे विजय हजारे ट्रॉफीला मुकलो होतो. तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला की, माझी दुखापत अधिक गंभीर होऊ शकते. म्हणून मी क्रिकेट सोडून दुसरे क्षेत्र निवडायचे ठरवले,” असे शेवटी तिवारीने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
आमदार अशोक दिंडा! जगाने ट्रोल केलेला क्रिकेटर दिंडा राजकारणाच्या पीचवर सुपरहिट
टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार