भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय हे जगातील सर्व क्रिकेट बोर्डांपैकी श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे भारतीय संघात खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला बराच पैसा मिळतो. त्यातही अजून बीसीसीआय दरवर्षी इंडियन प्रिमीयर लीग म्हणजे आयपीलचे आयोजन करते. त्यामुळे केवळ भारतीय क्रिकेटपूंना नाही तर जगातील सर्व सहभागी क्रिकेटपटूंना यातून पैसा मिळतो.
एकंदरीत यावरून एवढे कळून येते की, जर एखादा भारतीय क्रिकेटपटू अत्यंत गरीब परिस्थितीतून येऊन पुढे त्याने क्रिकेट क्षेत्रात मोठे नाव कमावले. तर, त्याच्या जीवनाचा पूर्णपणे कायापलट होऊ शकतो. असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांचे जीवन क्रिकेट क्षेत्रात उतरल्यानंतर पूर्णपणे बदलले आहे.
तर जाणून घेऊयात अशा काही भारतीय क्रिकेटपटूंविषयी, जे अतिशय गरिबीतून येऊन आता कोट्यावधींचे मालक बनले आहे. Indian Cricketers came from poverty.
एमएस धोनी (MS Dhoni) –
भारताचा कॅप्टनकूल एमएस धोनी याचे जीवन क्रिकेटमुळे पूर्णपणे बदलून गेले. तो लहान असताना त्याचे वडील खेळपट्टीची देखभाल करण्याचे (पिच क्यूरेटर) काम करत होते. त्यांची इच्छा होती की धोनीने चांगली सरकारी नोकरी करावी. त्यांनी धोनीला रेल्वे तिकिट कलेक्टरची नोकरीही करायला सांगितली होती. पण, धोनीचे लक्ष्य फक्त क्रिकेट खेळणे, हे असल्याने त्याने वडिलांच्या स्वप्नांना बाजूला ठेवत आपले स्वप्न पूर्ण करण्याला जास्त महत्त्व दिले.
आज तो जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. क्रिकेटने त्याच्या जीवनाचा पूर्ण कायापलट करून टाकला. आज धोनीला भारतीय क्रिकेटच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. पहा धोनीची कमाई या लिंकवर
इरफान पठाण – यूसुफ पठाण (Irfan Pathan – Yusuf Pathan) –
भारतीय क्रिकेट संघातील पठाण बंधू म्हणजे इरफान पठान आणि यूसुफ पठान हे यांची सुरुवातीची परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांचे वडील हे मशीदमध्ये झाडू मारण्याचे काम करत असायचे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की इरफान आणि यूसुफला क्रिकेटपटू बनवायचे. ते दोघेही लहान असताना त्यांच्या वडिलांच्या २५० रुपयांवर त्यांचे घर चालायचे. पण, पुढे त्यांनी दोघांनाही क्रिकेट क्षेत्रात पाठवण्यासाठी खूप मेहनत केली. इरफान आणि यूसुफ क्रिकेटच्या सरावाला जायचे, तेव्हा त्यांचे वडिल त्यांच्या जुन्या चप्पल शिवून त्यांना द्यायचे. एवढ्या गरिबीतून येऊन इरफान आणि यूसुफने क्रिकेट क्षेत्रात आज आपापली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचा गोष्ट इरफान पठाणची
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) –
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकटपटू रविंद्र जडेजाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. तो क्रिकेट क्षेत्रात येण्यापुर्वी त्याचे वडील सुरक्षा रक्षकाची (सेक्युरिटी गार्ड) नौकरी करत असायचे. तर, आई परिचारिका (नर्स) होती. त्याचे पूर्ण कुटुंब एका सरकारी क्वार्टरमध्ये राहत होते. पण जडेजाला क्रिकेटपटू व्हायचे होते. आज तो भारतीय संघातील उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याच्या क्षेत्ररक्षणासाठीही त्याला ओळखले जाते. शिवाय आता त्याच्याकडे घर, पैसे अशा गोष्टींची कमी नाही. पहा जडेजाची संपत्ती या लिंकवर
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) –
हार्दिक पंड्याचा सर्वसामान्य मुलगा ते क्रिकेटपटू बनेपर्यंतचा प्रवासही खूप रोमांचक होता. तो नेहमी सोशल मीडियाद्वारे त्याच्या कुटुंबाचे जुने फोटो शेअर करत असतो. त्यावरून दिसून येते की त्याचे सुरुवातीचे जीवन खूप संघर्षाने भरलेले होते. पंड्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो लहान असताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप वाईट होती. त्यामुळे त्याला आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याला फक्त मॅगी खाऊन रहावे लागायचे. हार्दिककडे तर त्याचे क्रिकेट किट विकत घेण्याइतकेही पैसे नव्हते. पण, आता तो भारतीय संघातील उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याची आर्थिक स्थितीसुद्धा खूप चागंली आहे. वाचा पंड्या ब्रदर्सची संपुर्ण स्टोरी
उमेश यादव (Umesh Yadav) –
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे सुरुवातीचे जीवन खूप संघर्षाने भरलेले होते. त्याचे वडील कोळश्याच्या खाणीत काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरी पैशाची खूप तंगी असायची. म्हणून त्याच्या वडिलांची इच्छा होती की यादवने सरकारी नोकरी करावी. त्यांनी यादवला पोलिस हवालदारदेखील बनवायची तयारी करून ठेवली होती. पण, यादवने क्रिकेट क्षेत्र निवडले. आता त्याचे जीवन पुर्वीपेक्षा खूप चांगले आहे. वाचा उमेश यादवची संपुर्ण स्टोरी
वाचा-
पुण्यात आहेत दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, जाणून घ्या कोणती?
पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला; वाचा अशोक डिंडाच्या आयपीएल एन्ट्रीची शानदार कहाणी