एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) २७ धावांनी विजय मिळवला. सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयाचा शिल्पकार फाफ डू प्लेसिस ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सीएसकेच्या या विजयानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आजी- माजी क्रिकेटपटू तसेच आयपीएल संघही सीएसकेच्या विजयावर शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणी- कोणी दिल्या आहेत सीएसकेला शुभेच्छा… (Indian cricketers congratulate CSK and MS Dhoni on winning the IPL trophy for the fourth time)
सनरायझर्स हैदराबाद संघाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरने ट्वीट करत सीएसकेचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये धोनीला टॅग करत लिहिले की, “अप्रतिम विजय सीएसके आणि एमएस धोनीबद्दल आपण काय म्हणू शकता.”
Well done CSK a great win and what can you say about @msdhoni
— David Warner (@davidwarner31) October 15, 2021
तसेच सनरायजर्स हैदराबाद संघाचाच फिरकीपटू राशिद खानने ट्वीट करत लिहिले की, “एमएस धोनी आणि सीएसके खूप खूप अभिनंदन.” राशिदने आपल्या ट्वीटमध्ये हाताने सेलिब्रेशन करणाऱ्या आणि टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीचाही समावेश केला आहे.
M S D 🙌🏻🙌🏻 Congratulations @ChennaiIPL 👏🏻👏🏻 #IPL2021Final
— Rashid Khan (@rashidkhan_19) October 15, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही सुंदर ट्वीट केले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “एमएस धोनी फक्त नावच पुरेसे आहे. अभिनंदन सीएसके.”
Mahendra singh Dhoni 💛 name is enough congratulations ❤️💛 @ChennaiIPL #IPL2021
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) October 15, 2021
याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही सीएसकेचे कौतुक केले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “सीएसकेने चांगली कामगिरी केली.” यासोबतच त्याने आपल्या ट्वीटमध्ये फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर आणि लुंगी एंगिडी यांना टॅग करत त्यांचेही कौतुक केले.
Well done to CSK
I mean, they pretty darn good 👍
Well done @faf1307 @ImranTahirSA @NgidiLungi Eric and Kingers
— Dale Steyn (@DaleSteyn62) October 15, 2021
सीएसकेला इतर अनेक खेळाडूंनी तसेच आयपीएल संघांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे ट्वीट्स-
Aaj toh banta hai. Congratulations and respect, @ChennaiIPL. 🏆 pic.twitter.com/nuVz07yYbz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 15, 2021
Congratulations @ChennaiIPL on winning #IPL2021 💛🏆 pic.twitter.com/y3OGNL9QJC
— Mumbai Indians (@mipaltan) October 15, 2021
Many Congratulations on lifting the #IPL2021 trophy, @ChennaiIPL 🏆#CSKvKKR #IPLFinal pic.twitter.com/G33s3YGg0b
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 15, 2021
Brilliant is just not the word to describe @ChennaiIPL, no.4 and well deserved, Brilliant captaincy by @msdhoni and what a team! Great to watch, proud to be a chennaite and a tamilian! #CSKvsKKR #KKRvsCSK #IPLFinal
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) October 15, 2021
Vandhom vendrom sendrom.Ini varuvom velvom selvom.Nandri makkaley yendrundrum ungal anbu sagodharan 🙏 @ChennaiIPL #Yellove
— Imran Tahir (@ImranTahirSA) October 15, 2021
Learnings from the greatest ipl team
-respect experience
-Give players enough opportunity & time to get through phases in form
-Give players the freedom to express
-Less closed room meetings,more one-one during practice session.
-Treat non playing members respectfully #csk— Shreevats goswami (@shreevats1) October 15, 2021
Congratulations to @ChennaiIPL great team effort 🏆 #IPLFinal
— Khaleel Ahmed 🇮🇳 (@imK_Ahmed13) October 15, 2021
A clinical performance by CSK across all departments ensuring a convincing victory to win the #VIVOIPL2021 for the 4th time! Congratulations to @msdhoni and @ChennaiIPL for an amazing season!
— parthiv patel (@parthiv9) October 15, 2021
आयपीएल इतिहासातील चेन्नईची कामगिरी
आयपीएल इतिहासातील सीएसकेच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर सीएसकेने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचे विजेतेपदक पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांनी एकूण ११ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान त्यांनी ९ वेळा अंतिम सामना खेळला आहे.
हेही वाचा-
-ऋतु आणि फाफने केले आयपीएल २०२१ वर ‘राज’; विराट-एबीशी केली बरोबरी
-नादच खुळा! ४ वेळा विजयी, ९ वेळा उपविजयी, ‘अशी’ आहे आयपीएल इतिहासातील सीएसकेची कामगिरी