भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडच्या काळात दुखापतग्रस्त झाल्याचे दिसत आहे. त्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश होता. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घ काळापासून संघात परतला नाहीये. दुसरीकडे, श्रेयस अय्यर हादेखील दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर जाणार आहे. खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघासोबतच कर्णधार रोहित शर्मा हादेखील खूपच चिंतेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-2ने पराभवाचा धक्का बसल्यानंतर रोहितने यासंदर्भात मोकळेपणाने चर्चा केली. तसेच, याबाबत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपले मत मांडले.
काय म्हणाले शास्त्री?
माध्यमांशी बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी खेळाडूंच्या दुखापतींवर भाष्य केले. ते म्हणाले की, “खेळाडूंच्या दुखापतींबाबत विचार करणे माझ्यासाठी कटीण आहे. ज्या काळात आम्ही खेळलो आणि आम्हाला ज्या सुविधा मिळाल्या होत्या, तेव्हा खेळाडू आरामात 8-10 वर्षे खेळायचे. त्यापैकी अनेक खेळाडू 10 महिने खेळायचे. ज्यात काऊंटी क्रिकेटचाही समावेश होता. त्यामुळे मला कळत नाही की, हे अधिक क्रिकेट खेळल्यामुळे होत आहे का?”
पुढे बोलताना शास्त्री म्हणाले की, “जगभरात अनेक लीग खेळल्या जात आहे, त्यामुळे खेळाडूंच्या विश्रांतीसाठी जो वेळ होता, तो कमी होत चालला आहे. अशात मला वाटते की, या मुद्द्यावर बोर्ड आणि खेळाडूंना एकसोबत बसून चर्चा केली पाहिजे. जर आयपीएलबाबतही काही बाबी असतील, तर बोर्डाने तिथे पुढाकार घेतला पाहिजे आणि फ्रँचायझी संघांना सांगितले पाहिजे की, या खेळाडूची आम्हाला गरज आहे, भारताला गरज आहे. त्यामुळे भारताच्या नावाखाली त्याने काही सामने खेळले नाहीत, तर चांगले होईल.”
भारतीय संघाने गमावली मालिका
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 21 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे भारताने वनडे मालिका 1-2ने गमावली. पहिल्या सामन्यात भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा याचे संघात पुनरागमन झाल्याने संघाची धुरा त्याच्या खांद्यावर पडली. रोहितला दोन्ही वनडेत संघाला विजय मिळवून देता आला नाही.
आयपीएल 2023ला 31 मार्चपासून सुरुवात
आता 31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू आपला दम दाखवताना दिसणार आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची अशी इच्छा असेल की, या स्पर्धेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना कोणतीही दुखापत झाली नाही पाहिजे. (indian cricketers injuries former head coach ravi shastri told the best way to save players from injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 लॉर्ड बनला एमआयचा गुरू! प्रशिक्षक म्हणून पोलार्डने सुरू केली नवीन इनिंग
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणतोय, “वेळापत्रक खूप व्यस्त, विश्रांती मिळत नाही”