Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहितच्या ‘त्या’ निर्णयाने संतापले शास्त्री! म्हणाले, “उमेश-शमी तितके तरूण नाहीत आणि तुम्ही…”

March 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravi Shastri Admired Indian Youngsters

Photo Courtesy: Twitter/ICC


बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद 36 अशी मजल मारली आहे. सध्या भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची चूक कुठे झाली याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शास्त्री यांना भारतीय संघ कुठे मागे पडला असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले,

“कर्णधाराने दुसरा नवीन चेंडू घेण्याचा निर्णय घेतला तिथे मला भारतीय संघ मागे पडल्याचे वाटते. तुमच्याकडे उमेश यादव व मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांचे वय आता 35‌ च्या आसपास आहे. ते आता दिवसाच्या शेवटी येऊन विरोधी फलंदाजांना घाबरवू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला युवा वेगवान गोलंदाज हवे असतात.”

भारतीय संघाने पहिल्या दिवसातील अखेरची नऊ षटके शिल्लक असताना नवीन चेंडू घेतला. यावर ख्वाजा व कॅमेरून ग्रीन यांनी 54 धावा वसूल केल्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी देखील या रणनीतीवर टीका केली होती.

ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या. ख्वाजाच्या 180 धावांच्या योगदानाव्यतिरिक्त युवा कॅमेरून ग्रीन याने देखील शतकी खेळी केली. नवव्या गड्यासाठी लायन व मर्फी यांनी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक सहा बळी टिपले.

(Ravi Shastri And Sanjay Manjarekar Slam Rohit Sharma For Taking Second New Ball In Ahmedabad Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इथे-तिथे, यहां-वहां, फक्त धोनीचीच हवा! कट्टर फॅनने लग्नाच्या पत्रिकेवर छापला माहीचा फोटो, पाहिला का?
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक


Next Post
Masaba-Gupta-And-Pandya-Brothers

हार्दिक अन् कृणालने घरात खेळले क्रिकेट, व्हिडिओ पाहून विवियन रिचर्ड्स यांची मुलगी म्हणाली, 'मला तर...'

Virat-Kohli

हीच ती वेळ! खराब फॉर्ममधून चाललेल्या विराटबाबत दिग्गजाचे लक्षवेधी वक्तव्य

Photo Courtesy: Twitter/WPL

हिलीच्या 'कॅप्टन्स इनिंग'ने युपीचा 10 विकेट्सने विजय! आरसीबीची सलग चौथी हार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143