---Advertisement---

‘विसरू नका, विराट-रोहित आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये फ्लॉप ठरलेत,’ दिग्गजाचे भारतीय संघाच्या मर्मावर बोट

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test
---Advertisement---

आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान साउथम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाकडे विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यासारखे धुरंदर खेळाडू आहेत. अशा स्थितीतही मागील काही वर्षापासून भारतीय संघ आयसीसीच्या नॉकआउट फेरीमध्ये कच खात असल्याची बाब भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता याने निदर्शनास आणून दिली आहे.

दासगुप्ताने सांगितली गंभीर बाब
भारतीय संघाचा माजी सलामीवीर व यष्टीरक्षक असलेला दीप दासगुप्ता हा सध्या प्रसिद्ध समालोचक बनला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला, “तुम्ही आकड्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सर्वांची अपेक्षा असते की, संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाने आणि गोलंदाजाने महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी. ते अनेकदा यामध्ये अपयशी ठरतात. मात्र त्यांनी या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये दबाव असतो. माझी या खेळाडूंशी या गोष्टीवर चर्चा झाली नाही. परंतु, त्यांनी चांगली कामगिरी केली नाही हे सत्य आहे.”

भारतीय संघाने आपला अखेरची आयसीसी स्पर्धा २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने जिंकली होती. तेव्हा एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यानंतर भारतीय संघ २०१५ विश्वचषकाच्या व २०१६ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत व २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटच्या अनुपस्थितीत ‘हे’ खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर करु शकतात फलंदाजी, एकाने केलंय शतक

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय यष्टीरक्षकावर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचे झाले कोरोनाने निधन

WTC Final महामुकाबला तोंडावर; न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणे…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---