---Advertisement---

WTC Final महामुकाबला तोंडावर; न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणे…”

On: मंगळवार, मे 18, 2021 1:23 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची (डब्लूटीसी फायनल) उलटगिणती सुरू झाली आहे. या महामुकाबल्यासाठी ३० दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे हा सामना खेळला जाईल. तत्पुर्वी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन भारतीय संघाविषयी याने मोठे वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडचा संघ यापूर्वीच इंग्लंडला पोहोचला आहे. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. दोन्ही देशांमधील पहिली कसोटी लंडनमध्ये २ जूनपासून आणि दुसरी कसोटी बर्मिंगहॅममध्ये १० जूनपासून खेळली जाईल. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडची तयारी अधिक चांगली होईल. कारण, न्यूझीलंड संघाकडे इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ असेल.

https://twitter.com/ICC/status/1394488663195541508?s=19

विलियम्सनने भारतीय संघाविषयी केले विधान
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने भारतीय संघाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आयसीसी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणे मोठे आव्हान आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत भाग घेणे खरोखरच रोमांचक आहे. पण जेव्हा आम्ही अंतिम सामना जिंकू तेव्हाच आम्हाला हायसे वाटेल.”

भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. परंतु, भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा फलंदाज हनुमा विहारी इंग्लंडमध्येच आहे. तो म्हणाला की, “मी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याबद्दल खूप उत्साही आहे. माझे संपूर्ण लक्ष खेळाकडे आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसारख्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणे भारतासाठी खरोखर मोठी गोष्ट आहे.”

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बीसीसीआयने या अंतिम सामन्यासाठी व त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० सदस्यीय संघाची निवड केली आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘त्या’ सामन्यानंतर धोनीच्या भिडूला अन् त्याच्या पत्नीला देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी

कमिन्सचं नाव ‘सँड’वर लिहा, ‘पेपर’वर नको; माजी भारतीय खेळाडूने अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० विश्वचषक खेळण्यापासून राहू शकतो वंचित, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---