---Advertisement---

धक्कादायक! ‘त्या’ सामन्यानंतर धोनीच्या भिडूला अन् त्याच्या पत्नीला देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी

On: मंगळवार, मे 18, 2021 1:09 PM
---Advertisement---

कोणत्याही खेळाबाबत काही चाहते खूप भावनिक असतात. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. संघाचा पराभव झाल्यास खेळाडूंचे पुतळे जाळण्यापासून ते खेळाडूंच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत चाहत्यांची मजल जाते. तर, काहीवेळा खेळाडूंना जीवे मारण्याची धमकीही मिळालेली दिसून येते. आता तब्बल १० वर्षानंतर असाच एक खुलासा झाला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूला व त्याच्या पत्नीला २०११ विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या खेळाडूला मिळालेली धमकी
भारतीय उपखंडात आयोजित २०११ क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी साखळी सामन्यांमध्ये उत्कृष्ट राहिली होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यानंतर त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य असलेल्या फाफ डू प्लेसिस याला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. स्वतः प्लेसिसने याबाबत खुलासा केला आहे.

आपल्याला व आपल्या पत्नीला त्या पराभवानंतर मारून टाकण्याची धमकी एका माथेफिरूने दिली होती असे तो म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेचा झाला होता पराभव
मीरपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघासमोर ठेवले होते. मात्र, न्यूझीलंडच्या अप्रतिम गोलंदाजी पुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ १७० धावांमध्ये ढेपाळला. प्लेसिसने या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४३ चेंडूत ३६ धावा बनविल्या होत्या. परंतु, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही व अनेकांच्या टीकेचा धनी बनला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आहे प्लेसिस
फाफ डू प्लेसिस हा सध्या जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने काही काळ दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व देखील केले होते. तसेच आयपीएलमध्ये तो एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. ३६ वर्षीय प्लेसिसने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार पेक्षा धावा बनविल्या आहेत. यामध्ये २३ शतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! ‘या’ खेळाडूच्या फोनमध्ये सापडले अश्लील व्हिडिओ, बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक

कमिन्सचं नाव ‘सँड’वर लिहा, ‘पेपर’वर नको; माजी भारतीय खेळाडूने अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

“मला खर काय आहे ते माहीत आहे,” बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---