बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हटले जाते. भारतीय संघात खेळणारे क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीत इतके पैसे कमवून घेतात की, क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरही त्यांना आर्थिक अडचण जाणवत नाही. परंतु असेही काही खेळाडू आहेत, जे क्रिकेट कारकिर्द सुरू असताना किंवा निवृत्तीनंतर सरकारी नोकरी करतात. हो, कोट्यावधींची कमाई करणारे भारतीय क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्याबरोबर सरकारी नोकरीही करतात. चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू?
१) युजवेंद्र चहल : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? चहल क्रिकेटसह आयकर विभागात अधिकाऱ्याचे कामदेखील पाहातो. त्याने भारतीय संघासाठी एकूण ५६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याला ९७ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर ४९ टी-२० सामन्यात त्याला ६३ गडी बाद करण्यात यश आले आहे.
२) उमेश यादव : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर आपल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे; तर मैदानाबाहेर तो भारतीय रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहे. तो खेळाडू असल्यामुळे त्याला हे पद देण्यात आले आहे. तसेच क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी उमेशला पोलीस व्हायचे होते.
३) कपिल देव : भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ते आता भारतीय सेनेत लेफ्टनेंट कर्नलची नोकरी करत आहेत.
४) जोगिंदर शर्मा : २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने सामने होते. त्यावेळी शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार एमएस धोनीने जोगिंदर शर्माला दिली होती. त्याने ही जबाबदारी चोखपणे पार पाडत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. जोगिंदर शर्माची कारकीर्द जास्त काळ टिकू शकली नाही. परंतु क्रिकेटनंतर त्याने सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. तो आता हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे.
५) हरभजन सिंग : भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने देखील टी-२० विश्वचषक २००७ आणि २०११ विश्वचषकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसतो. क्रिकेटव्यतिरिक्त हरभजन सिंग पंजाब पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली नाहीये.
६) सचिन तेंडुलकर : भारतीय क्रिकेटमध्ये ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २४ वर्षे भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके आणि असंख्य विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर सचिनने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. परंतु निवृत्ती घेतल्यानंतर त्याला वायुसेनेच्या एका ग्रुपचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
७) एमएस धोनी : भारतीय संघाला २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार एमएस धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. परंतु तो अजूनही आयपीएल स्पर्धा खेळत असतो. त्याचे देशावरचे प्रेम आपण अनेकदा पहिले आहे. क्रिकेट खेळत असताना त्याला भारतीय सेनेत लेफ्टनेंट कर्नलचे पद देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जावईप्रेम! भावी सासरे दुखापतग्रस्त झाल्यामुळे शाहिन आफिद्री हळहळला, देवाकडे केली प्रार्थना
तो अनेकदा मैदानात येण्यापुर्वी सिगारेट ओढायचा; संघ सहकाऱ्याकडून माजी क्रिकेटरची ‘पोलखोल’