रविवारी (दि. 30 एप्रिल) 36वा वाढदिवस साजरा करत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केली आहेत. त्यातील एक विक्रम असा की, तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके करणारा भारताचा सुरेश रैना नंतरचा दुसरा क्रिकेटपटू आहे.
भारताकडून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके करण्याचा विक्रम 5 भारतीय क्रिकेटपटूंनाच करता आला आहे. यात रैना, रोहित, केएल राहुल, विराट कोहली आणि शुबमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे. भारताकडून असा विक्रम सर्वात आधी सुरेश रैनाने केला होता. त्याने 2010 ला हा विक्रम केला. रैनाने आत्तापर्यंत कसोटीत 1 शतक, वनडेत 5 शतके आणि टी20 मध्ये 1 शतक केले आहे.
रैनानंतर 2015 ला रोहित क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके करणारा दुसरा भारतीय ठरला. रोहितने आत्तापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 9 शतके केली आहेत. त्याने 243 वनडे सामन्यात 30 शतके केली आहेत. रोहित हा भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने 148 टी20 सामने खेळले असून 4 शतकेही केली आहेत.
रोहितनंतर हा पराक्रम केएल राहुलने केला. त्याने कसोटीत 7 शतके, वनडेत 5 शतके आणि टी20 मध्ये 2 शतके आत्तापर्यंत केली आहेत. राहुलनंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनीही हा पराक्रम केला आहे. विराटने आतापर्यंत कसोटीत 28, वनडेत 46 आणि टी20त 1 शतक केले आहे. तसेच, गिलने कसोटीत 2, वनडेत 4 आणि टी20त 1 शतक केले आहे.
नमुद करण्यासारखी गोष्ट अशी की रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 शतके करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात प्रत्येकी 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी पाकिस्तानचा कोच झाल्यानंतर सांगेल’, म्हणत पत्रकाराच्या मेहनतीवर पाणी फेरणारा हजरजबाबी रोहित शर्मा
आज कोट्यावधींचा मालक असलेल्या रोहितकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, ‘अशी’ भागवायचा गरज
‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून