भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने अगोदर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. हा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात खेळण्यात आला होता. यानंतर भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्ट पासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूंनी आपल्यासोबत आपल्या परिवारादेखील नेले आहे.
त्यामुळे खेळाडूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयने दिलेल्या २० दिवसांच्या सुटीदरम्यान आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवला होता. या सुटीदरम्यान खेळाडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसून आले होते. ही सुटी १४ जुलैदरम्यान संपली. त्यानंतर खेळाडू डरहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सरावासाठी एकत्र आहे आहेत. काहीदिवसांपूर्वीच भारताने तीन दिवसीय सराव सामना देखील खेळला.
त्यामुळे सर्व खेळाडू सध्या सरावात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुले डरहॅममध्ये विविध ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, उमेश यादव आणि चेतेश्वर पुजारा यांची पत्नी आणि मुले एकत्र फिरण्यासाठी गेले होते. या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. हे फोटो क्रिकेटरच्या पत्नींनी सोशल मीडियावरही शेअर केल्या आहेत. अजिंक्यची पत्नी राधिकानी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केली आहेत.
या फोटोमध्ये राधिका, चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरी आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह गॉगल घातलेली दिसून येत आहेत. हा फोटो बघून तुम्ही अंदाज लावू शकता की या सर्वांमध्ये चांगली मैत्री आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये रोहित शर्माची मुलगी समायरा, चेतेश्वर पुजाराची मुलगी अदिती आणि अजिंक्य रहाणेची मुलगी आर्या एकत्र खेळताना दिसून येत आहेत.
या फोटोमध्ये पूजा, रितिका, तान्या आणि राधिका आपल्या मुलींसोबत देखील दिसून येत आहेत. या फोटोवरून असे दिसून येत आहे की, या सगळ्याजणींनी एकमेकांसोबत खूप एन्जॉय केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानात घुसला चाहता, त्यानंतर बेन स्टोक्सनेही केली ती चूक; सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली
दु:खद! १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन, क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त
‘मास्टर ब्लास्टर’च्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती