भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. मात्र, हा सामना पाहण्यासाठी दुबईला गेलेल्या एका भारतीय चाहत्याला पाकिस्तानची जर्सी घालणे चांगलेच महागात पडले आहे. या चाहत्याला व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचा धमक्या देण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील संयम जयस्वाल हा भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमेरिकेतून थेट दुबई येथे पोहोचला होता. सामना सुरू होण्याआधी तो भारतीय संघाची जर्सी विकत घेण्यासाठी पोहोचला. मात्र, भारतीय संघाची जर्सी संपल्यामुळे त्याने पाकिस्तान संघाचे जर्सी व भारताचा तिरंगा ध्वज विकत घेतला. तो पाकिस्तानची जर्सी घालून मैदानात दाखल झाला व भारतीय संघाला पाठिंबा देत राहिला. त्याचवेळी त्याने आपले पाकिस्तानची जर्सी घातलेला व भारताचा ध्वज घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र, आता ते छायाचित्र पोस्ट करणे त्याला महागात पडले आहे.
पाकिस्तान संघाची जर्सी घातल्याने त्याला गद्दार आणि देशद्रोही असे म्हटले जाऊ लागले आहे. अनेकांनी त्याला आणि त्याच्या घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत. संपूर्ण प्रकरण माहित नसताना प्रकारे व्यक्त होणे चुकीचे असल्याचे संयम यांनी म्हटले. गोरक्षक दलाच्या हिमांशू पटेल यांनी या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे माझ्या हृदयविकाराचा आजार असलेल्या वडिलांना त्रास होऊ शकतो असे संयम याने म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार पाकिस्तानी; उपकर्णधार भारतीय! पाहा हाँगकाँगचा प्रत्येक खेळाडू मूळचा कोणत्या देशाचा
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच