सध्या क्रिकेटविश्वात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची चर्चा सुरु आहे. आजी-माजी खेळाडू तसेच, चाहते अगदी आतुरतेने या सामन्याची वाट पाहत आहेत. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून (१८ जून) हा सामना सुरू होणार आहे. मात्र, सध्या एजबॅस्टनमध्ये पाऊस असल्याने सामना उशिरा सुरू होईल. त्या वेळी मैदानात हजर असलेल्या चाहत्यांनी पावसापासून संरक्षण करण्यासाठी चक्कर राष्ट्रध्वजाचा वापर केला.
पावसामुळे लांबणीवर गेला अंतिम सामना
प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लिश प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता तर, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, एजबॅस्टनमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मैदान पूर्ण ओले झाले. कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत मैदान सुके करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शुक्रवारी सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सततच्या पावसाने व मैदानाची खराब किती पाहता आयोजकांनी नाणेफेक पुढे ढकलत दिवसातील पहिले सत्र रद्द केले.
चाहत्यांनी वापरला राष्ट्रध्वज
पाऊस सुरू असल्याने अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या प्रेक्षकांनी मैदानात आसरा घेण्यासाठी व पावसापासून बचावासाठी विविध साधनांचा वापर केला. काही भारतीय चाहत्यांनी तर, चक्क राष्ट्रध्वज असलेला तिरंगा रेनकोट म्हणून वापरला. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने ट्विट करताना दोन छायाचित्रे पोस्ट करत लिहिले, ‘जेव्हा तुमचा राष्ट्रध्वज रेनकोटमध्ये परावर्तित होतो आणि छत्री सर्वात महत्त्वपूर्ण साहित्य वाटू लागते. सुपर सॉपरमधून उडणाऱ्या पाण्याचे शिंतोडे आयुष्यातील सर्वात मोठी गंमत वाटते त्यावेळी ओळखून जा की, तुम्ही साऊथॅम्टनमध्ये आहात.’
https://twitter.com/cricbuzz/status/1405822189878710275?s=19
काही दिवस पावसाचा वर्तविला आहे अंदाज
‘एक्युवेदर’ या हवामान विषयक संकेतस्थळाच्या माहितीनुसार, एजबॅस्टनमध्ये येत्या २४ तासात पावसाची संततधार राहील. या ठिकाणचे उच्च तापमान १६ डिग्री आणि कमीतकमी १२ डिग्री असेल. तसेच दिवसभर थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. असेच वातावरण पुढील ५ दिवस असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’
जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार
धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर





