भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India Tour Of South Africa) रविवारपासून (२६ डिसेंबर) सुरुवात झाली. सेंच्युरीयन (Centurion Test) येथील पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण, मागील काही काळापासून सातत्याने अपयशी ठरत असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला या संघात स्थान दिले गेले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
रहाणेला मिळाली पुन्हा एकदा संधी
मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणे कमालीचा अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर तसेच इंग्लड दौऱ्यावर तो पुरता अपयशी ठरलेला. तसेच नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो धावांसाठी झगडताना दिसला. त्यामुळे, त्याला संघाच्या उपकर्णधारपदावरूनही हटविले गेले. यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर युवा श्रेयस अय्यरला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, सेंच्युरीयन कसोटीत कर्णधार विराट कोहली व संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा रहाणेवर विश्वास ठेवत संधी दिली. रहाणेने मागील दोन दौऱ्यांवर दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी केली होती. याच कारणास्तव त्याला संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. (Fans After Rahane Select In Centurion Test XI)
चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘रहाणे या कसोटीच्या दोन्ही डावात अपयशी व्हावा. मात्र, भारत या सामन्यात जिंकावा. त्यामुळे पुढील सामन्यात विहारीला खेळताना पाहता येईल.’
Sincerely hoping Rahane fails in both innings but India wins the test. Makes it easy for Vihari to come in for the next 2 tests.
— Vinod Kumar (@theNorth3rnWolf) December 26, 2021
अन्य एका चाहत्याने लिहिले,
‘या रहाणेला आणखी किती संधी देणार?’ तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, ‘रहाणेला असे काय गुपित माहित आहे की, तुम्ही त्याला वारंवार संधी देत आहात?’
How many chances does rahane get?? Baffling
— Tan Tana Tan Seenu (@carrom2019) December 26, 2021
What or whose secret does Rahane knows that he keeps getting a chance.? Or is the mumbai circle too dominant in BCCI?
Itne chances me ek bar to koi bhi perform kr dega..pheww..
Tough on Hanuma Vihari.Anyway. Good Luck Team India.
Game on .#INDvsSA— hakoonamatata (@sharmarohit2890) December 26, 2021
या दौऱ्याआधी भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीने शानदार फलंदाजी करत या मालिकेसाठी दावेदारी ठोकली होती. मात्र, त्यालाही या सामन्यात संधी मिळाली नाही.
भारताची शानदार सुरुवात
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी सार्थ ठरविला. दोघांनी जोखीम न घेता भारताला अभेद्य शतकी भागीदारी करून दिली. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत भारताने बिनबाद १०९ धावा केल्या होत्या. मयंक ५६ तर राहुल ४३ धावा करून नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-