---Advertisement---

‘गरीबों का सस्ता वाला बेन स्टोक्स’; लंकेविरुद्ध सपशेल फ्लॉप ठरलेला हार्दिक झाला ट्रोल

On: शनिवार, जुलै 24, 2021 3:10 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात शुक्रवारी (२३ जुलै) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पार पडला. २-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेला या मालिकेत क्लीन स्वीप करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. हा सामना श्रीलंका संघाने ३ गडी राखून जिंकला. मात्र भारताने २-१ ने वनडे मालिका खिशात घातली आहे. या मालिकेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या हार्दिक पंड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात ५ महत्वाचे बदल करण्यात आले होते. या सामन्यात ५ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे अनुभवी खेळाडूंकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. परंतु संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने फलंदाजी करताना अवघ्या १९ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याला अवघा १ गडी बाद करण्यात यश आले. तत्पुर्वीच्या २ वनडे सामन्यातही तो चांगली कामगिरी कू शकला नव्हता.

त्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करत चक्क ‘गरिबांचा स्वस्तातला बेन स्टोक्स’ असे म्हटले आहे.(Indian fans trolled hardik Pandya after 3rd odi)

हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. एका युजरने तर असे म्हटले आहे की, “त्याला संघांतून काढून टाकले पाहिजे. तो गोलंदाजी करू शकत नाही आणि फलंदाजीही करू शकत नाही.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “पंड्याला खूप संधी देण्यात आली आहे. आता त्याला संघातून काढून टाकायला हवे आणि नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी.”

https://twitter.com/WittyAbuser/status/1418571336524308483?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1418571336524308483%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Find-vs-sl-hardik-pandya-troll-after-his-poor-performance-80274

https://twitter.com/mrvigilantee/status/1418573251681284097?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1418573251681284097%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Find-vs-sl-hardik-pandya-troll-after-his-poor-performance-80274

तर एका आणखी युजरने लिहिले की, “हार्दिक पंड्या,भाई तुम्हाला ‘सी’ श्रेणीचा संघ बनवून दिला तेव्हा फलंदाजी कराल का..”

तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकअखेर २२५ धावा केल्या होत्या. यामध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या संजू सॅमसनने ४६ धावांचे योगदान दिले होते. तसेच या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने ७६ आणि भानुका राजपक्षेने ६५ धावांची खेळी करत हा सामना ३ गडी राखून श्रीलंका संघाला जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडहून आलं बोलावणं, सूर्यकुमारसह ‘हे’ २ धुरंधर कसोटीत इंग्लंडशी करणार दोन हात!

व्यस्त वेळापत्रकातही शॉने प्रेयसीसाठी काढला वेळ, मध्यरात्री ‘या’ अंदाजात केले बड्डे विशेष,

अरेरे… ‘कोहली’ अतिशय दुर्देवीपणे धावबाद; गल्ली क्रिकेटमध्येही असा रनआऊट पाहिला नसेल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---