भारतीय संघाने क्रिकेट जगताला एकापेक्षा एक गोलंदाज दिले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या नावाचाही समावेश होतो. भुवनेश्वरला ‘स्विंग किंग’ म्हणूनही ओळखले जाते. भुवीने अनेक महत्त्वाच्या सामन्यात आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. मात्र, तो आता जवळपास 18 महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. अशातच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे की, भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
भुवनेश्वर कुमारच्या निवृत्तीची चर्चा का होतेय?
खरं तर, भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या निवृत्तीची चर्चा होण्यामागील कारण मोठे आहे. भुवनेश्वर कुमारने इंस्टाग्राम बायो बदलले (Bhuvneshwar Kumar Changed Instagram Bio) आहे. दुसरीकडे, त्याने अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये अद्याप भारतीय क्रिकेटपटू असे लिहिले आहे. या छोट्याशा बायो अपडेटमुळे सोशल मीडियावर भुवीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यामध्ये किती सत्यता आहे, हे येणारा काळच सांगेल.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 28, 2023
भुवनेश्वर कुमार 33 वर्षीय असून त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2022मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या टी20 सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्च केल्या होत्या. तसेच, त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले नाहीये. खरं तर, भुवनेश्वर सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. भुवनेश्वरला यावर्षी बीसीसीआयने आपल्या केंद्रीय करारातूनही बाहेर केले होते. तसेच, आगामी आशिया चषक आणि विश्वचषक 2023 यांसारख्या मोठ्या स्पर्धेतही त्याचे संघात पुनरागमन होण्याची आशा नाहीये.
सन 2012मध्ये भारतीय संघाकडून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. भुवनेश्वरच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 21 कसोटी, 163 वनडे सामने आणि 87 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 2.95च्या इकॉनॉमी रेटने 63 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 5.08च्या इकॉनॉमी रेटने 141 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 6.96च्या इकॉनॉमी रेटने 90 विकेट्स घेतल्या आहेत. (indian fast bowler bhuvneshwar kumar retirement rumours after dropping cricketer from his insta bio)
महत्त्वाच्या बातम्या-
नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video
अमेरिकेच्या मेजर लीगमध्ये MI न्यूयॉर्कचा जलवा! सुपर किंग्सच्या नांग्या ठेचत मिळवले फायनलचे तिकीट