भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी याने गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला ‘फिनिशर’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीसारखा फिनिशर भारतीय संघाला अजूनपर्यंत लाभला नाही. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटूने एक नाव सुचवले आहे, जो फलंदाज भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो.
या वर्षाच्या शेवटी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मोलाची भूमिका बजावू शकतो. या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर त्याने जर चांगली कामगिरी केली तर टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याचे खेळणे निश्चित आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी करत नसल्यामुळे त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नव्हती. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे म्हणणे आहे की, तो युवराज सिंग आणि एमएस धोनी सारखी फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
शिवरामकृष्णन यांनी हिंदुस्तान टाईम्सला म्हटले की, “धोनी आणि युवराज गेल्यानंतर भारतीय संघाला फिनिशर मिळाला नाही. आपण धोनीनंतर एका चांगल्या फिनिशरच्या शोधात आहोत. हार्दिक पंड्या एक उत्तम फिनिशर होऊ शकतो. त्यासाठी त्याने पूर्णपणे फिट असणे गरजेचे आहे. तसेच जेव्हा तो गोलंदाजी करेल तेव्हा त्याचा आत्मविश्वास पुन्हा येईल.”(Indian former cricketer laxman sivaramkrishnan says hardik Pandya can be extremely dangerous finisher for team india)
तसेच ते पुढे म्हणाले, “हार्दिक खेळातील तीनही विभागांमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतो. जेव्हा जेव्हा तो योगदान देईल, तेव्हा तो मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या एक चांगला क्रिकेटपटू होईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिकला यश मिळवायचे असेल तर त्याची किल्ली फिटनेस असेल. जर त्याने आपल्या क्षमतेनुसार खेळी केली तर ते अप्रतिम असेल.”
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत हार्दिक पंड्याने फिनिशरची भूमिका योग्यरीत्या पार पाडली होती. आगामी श्रीलंकाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुरलीधरनचा लेक मैदान गाजवण्यासाठी होतोय सज्ज, त्याच्या गोलंदाजीत तुम्हालाही दिसेल बापाची छबी
‘मी केकेआरसाठी समस्या होतो, पण त्यावेळी मॉर्गनला कर्णधार बनायचे नव्हते,’ कार्तिकचा उलगडा
खुन्नस! गांगुली ९९ धावांवर बाद झाल्याचे ऐकताच बाथरुममधून पळत आला ‘हा’ दिग्गज, सुनावली खरीखोटी