टी20 विश्वचषक 2024 च्या यशानंतर भारतीय संघाचे दिग्गज विराट कोहली-रोहित शर्मा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली. शिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील या फाॅरमॅटला अलविदा केले. अश्या परिस्थितीत भारतीय संघ आगामी 27 जुलै पासून श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात आले होते. ज्यामध्ये टी20 मध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आले आहे.
वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या टी20 विश्वचषक विजयानंतर श्रीलंका दाैऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. पण टीम इंडियाच्या हेड कोच पदी गाैतम गंभीरची नियुक्ती झाल्यानंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी बोलवण्यात आले आहे. असा दावा वृत्त अहवालात करण्यात आले. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांची निवड करण्यात आले आहे.
श्रीलंकादाैऱ्यापूर्वी गाैतम गंभीर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत प्रश्न विचारले असते, गंभीर म्हणाला, “विराट आणि रोहित दोघांकडेही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, ते जागतिक दर्जाचे आहेत, कोणत्याही मालिकेविरुद्ध ते दोघेही संघात असतील. जसं की चॅम्पियन्स ट्रॉफी असो वा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका आहे आणि जर फिटनेस चांगली राहिल्यास 2027 चा विश्वचषक पण खेळतील”
Gambhir said “Both Virat & Rohit have lots of cricket left, they are World class, any team would have both of them – there is the Champions Trophy, Australia series, then if fitness goes well then the 2027 World Cup”. pic.twitter.com/BERmn0Utwc
— Johns. (@CricCrazyJohns) July 22, 2024
रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकापर्यंत 40 वर्षांचा होईल तर विराट कोहली 39 वर्षाचा होईल. अश्या परिस्थितीत भारतीय संघाचे हे महान फलंदाज आपल्या फिटनेसमध्ये सातत्य राखणार का? आणि टीम इंडियासाठी विश्वचषक 2027 खेळणार का? हे पाहणे म्हत्त्वाचे राहील.
श्रीलंका विरुद्धच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, 27 जुलै पासून टीम श्रीलंका दाैऱ्याला सुरुवात करेल.ज्यामध्ये टीम इंडियाला 3 टी20 आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळायचे आहे. टीम इंडियाचा पहिला टी20 सामना 27 जुलै तर शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी होईल. याच मालिकेपासून हेड कोच म्हणून गाैतम गंभीर आपल्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफ आज (22 जुलै) श्रीलंकेला रवाना होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”
‘सुर्यकुमारलाच कर्णधार का बनवले?’, आगरकर म्हणाला; हार्दिकचा एक प्रॅाब्लेम आहे….
‘ऋतुराज गायकवाडला का वगळले?’, आगरकर म्हणतोय; आम्ही…..