भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने शुक्रवारी (२९ एप्रिल) राष्ट्रिय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएसमध्ये खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी द्रविडने नॉर्थ इस्ट आणि प्लेट ग्रूपच्या खेळाडूंशी संवाद साधला. द्रविडने यापूर्वी एनसीएस प्रमुख आणि भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे आणि त्याला या कामाचा चांगला अनूभव आहे. अशात खेळाडूंना त्याच्याकडून मिळालेले मार्गदर्शन हे नक्कीच मोलाचे असेल. यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील उपस्थित होता.
राहुल द्रविड (Rahul Dravid) या युवा खेळाडूंसोबत एनसीएसमध्ये जवळपास ४५ मिनिटे चर्चा करत होता. हे सर्व खेळाडू एका खास शिबिरात भाग घेण्यासाठी एनसीएमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान ऍशेज विजेते गोलंदाजी प्रशिक्षक ट्राय कूली यांच्यासह इतरही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे शिबिर १८ एप्रिल रोजी सुरू झाले असून १२ मे रोजी संपणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “खेळाडूंसाठी ही एक अविस्मरणीय चर्चा होती. हे सत्र जवळपास ४५ मिनिट चालले.” एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मणने ट्वीट करून या सत्रासाठी द्रविडचे आभार मानले. ट्वीटमध्ये लक्ष्मणने लिहिले की, “माझा चांगला मित्र आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे खूप खूप आभार. त्याने बेंगलोरमध्ये एनसीएच्या शिबिरात भाग घेतलेल्या नॉर्थ इस्ट आणि प्लेट ग्रूपच्या खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी वेळ काढला. मला विश्वास आहे की, खेळाडूंनी या संधीचा पूर्ण फायदा घेतला असेल.”
Many thanks to my good friend & Team India head coach Rahul Dravid for having taken the time to speak to players from the North East & Plate group attending the NCA camp in Bengaluru. I am sure the boys would have welcomed the chance to take a peek into Rahul's mind. @BCCI #NCA https://t.co/BCmkRVViIp
— VVS Laxman (@VVSLaxman281) April 29, 2022
दरम्यान, राहुल द्रविडला भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यानंतर एनसीए प्रमुख पद खाली झाले होते. द्रविडने हे पद सोडल्यानंतर त्याचा मित्र आणि प्रशिक्षणाचा चांगला अनुभव असेलल्या व्हीव्हीएस लक्ष्मणवर ही जबाबदारी सोपवली गेली.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक द्रविडकडे सध्या आयपीएल सुरू असल्यामुळे थोडा मोकळा वेळ आहे. अशातच त्याने एनसीएसमध्ये या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले. आयपीएलचे सामने २९ मे रोजी संपतील आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी मायदेशातील टी-२० मालिका सुरू होईल. ५ सामन्यांची ही मालिका ९ जून ते १९ जून दरम्यान खेळली जाईल. त्यानंतर टी-२० आशिया चषकासाठी संघाला श्रीलंका दौरा करावा लागणार आहे, पण याविषयी अजून संभ्रम आहे. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळला जाणारा टी-२० विश्वचषक संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषवणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार अंतिम सामना
अशी २ कारणे, ज्यामुळे रोहित शर्मा अन् विराट कोहलीची तुलना तर होणारचं
‘आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी धन्यवाद’, रितीकाने रोहितचे अनसीन फोटो शेअर करत केले हटके बर्थडे विश