भारतीय हॉकी खेळाडू आणि पद्मश्री पुरस्कार विजेती राणी रामपाल सध्या चर्चेत आहे. त्यामागचं कारण आहे तिचं एक ट्विट. तिनं नुकतेच एअर इंडियाला टॅग करून आपली नाराजी व्यक्त केली. कॅनडातून भारतात परतत असताना राणीनं एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये तिच्या सामानासोबत आलेली समस्या शेअर केली, ज्यामुळे ती इंटरनेटवर बरीच चर्चेत आहे.
कॅनडाहून भारतात परतत असताना राणी रामपालची सुटकेस तुटलेली आढळली. ती एअर इंडियाच्या फ्लाइटनं दिल्लीला पोहोचली होती. त्यानंतर तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुटलेल्या सुटकेसचा फोटो शेअर केला आणि एअर इंडियाला फटकारलं. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “या शानदार सरप्राईजसाठी एअर इंडियाचं आभार. तुमचे कर्मचारी आमच्या बॅग्सशी असे वागतात. कॅनडातून भारतात आल्यानंतर मी आज दुपारी दिल्लीत उतरले तेव्हा माझी बॅग तुटलेली आढळली.”
Thank you Air India for this wonderful surprise. This is how your staff treat our bags. On my way back from Canada to India this afternoon after landing in Delhi I found my bag broken.@airindia pic.twitter.com/xoBHBs0xBG
— Rani Rampal (@imranirampal) October 5, 2024
राणी रामपालच्या या पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. यानंतर अनेक युजर्सनं तिच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं आवाज उठवला. एअर इंडियानंही तिच्या तक्रारीला तत्काळ प्रतिसाद दिला. एअरलाइननं दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटलं की, “प्रिय राणी रामपाल, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया आम्हाला तुमचे तिकीट तपशील, बॅग टॅग क्रमांक आणि नुकसान तक्रार क्रमांक/DBR कॉपी DM करा. आम्ही प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करू.”
एअर इंडियाच्या प्रतिसादावर बरेच लोक समाधानी नव्हते. राणी रामपालचे फॉलोअर्स आणि इतर सोशल मीडिया युजर्सनं एअरलाइनच्या सेवेवर टीका केली आणि हे अस्वीकार्य असल्याचं म्हटले. एका युजरनं लिहिलं, “तुम्ही परतावा किंवा भरपाईसाठी अर्ज केला होता का?” तर दुसरा म्हणाला, “एअर इंडियानं त्यांच्या सेवा सुधारल्या पाहिजेत. ते फक्त माफी मागतात पण प्रत्यक्षात काहीच सुधारणा करत नाहीत.”
हेही वाचा –
सूर्याच्या झेलने नाही तर रिषभ पंतने भारताला विश्वचषक जिंकून दिला; रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा
4 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या रैनानं शाकिबला धो-धो धुतलं, मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी; VIDEO पाहा
भारतात होणार पुढील आशिया कप, परंतु रोहित-विराट खेळणार नाहीत! कारण जाणून घ्या