---Advertisement---

CWG 2022 | पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात ४ पदकांची भर, वाचा खेळाडूंची कामगिरी

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 3:46 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूचे चांगले प्रदर्शन सुरूच आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या सुवर्णपदकांमध्ये अजून दोन पदकांच्या भर पडली. लॉन बॉल्स स्पर्धेतील भारतीय संघाच्या प्रदर्शनसाठी त्यांचे खास कौतुक केले जात आहे, ज्यांनी सुवर्ण पदक मिळवले. भारताच्या पदकांची संख्या सध्या १३ पर्यंत पोहोचली आहे.

कॉमनवेल्थ गेम्सच्या पाचव्या दिवसी भारतीय खेळाडूंची कामगिरी. – 

लॉन बोल्स –
भारताच्या चार सदस्यीक लॉन बॉल्स महिला संघाने कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामात पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावले आहे. अंतिम सामन्या त्यांनी दक्षिण आफ्रिका महिला संघाला १७-१० अशा अंतराने पराभूत केले.

टेबल टेनिस –
पुरुषांच्या टेबल टेनिस स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी मोठी कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर सिंगापूरचे आव्हान होते आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला. कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामातील भारताचे हे पाचवे सुवर्ण पदक होते.

बॅडमिंटन – 
भाराताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात मेलशियाने भारतीय संघाला ३-१ अशा अंतराने मात दिली. यापूर्वी भारतासाठी पुलेला गोपीचंदने कॉमनवेल्थ गेम्समध्ये अशी कामगिरी केली होती. पाचव्या दिवशी भारताला मिळालेले हे दुसरे रौप्य पदक होते.

वेटलिफ्टिंग – 
भारतीय वेटलिफ्टर विकास ठाकुरने क्लीन एँड जर्कमध्ये उचललेल्या १९१ किलो ग्राम वजनाच्या जोरावर त्याने रौप्य पदक पटकावले. ९६ कोली वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विकासने एकूण ३४६ किलो वजन उचलले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे आठवे पदक ठरले आहे.

लांब उडी – 
लांब उडी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीशंकर याने अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ८.०५ किलो मीटरची लांब उडी मारली होती. तर अनीस ७.६८ मीटर उडी मारून आठव्या स्थानावर राहिला. आते हे दोघे अंतिम फेरीत खेळतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर

दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर गेलेल्या कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण! म्हणाला, ‘सध्या मी…’

मागच्या दोन सामन्यात फेल ठरल्यामुळे रोहितला मोठा झटका, न्यूझीलंडच्या फलंदाजाने तोंडचा घास पळवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---