---Advertisement---

‘वनडे, टी२० विश्वचषक विजय, आता सगळचं विसरा’; गंभीरच्या ट्वीटवर भडकले क्रिकेटप्रेमी, केले ट्रोल

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 1:59 PM
Gautam-Gambhir
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आज (५ ऑगस्ट) जर्मनीच्या पुरुष हॉकी संघाचा ५-४ ने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. यासह हॉकी या खेळात देशाला ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर पदक मिळाली आहेत. या आनंदी प्रसंगी सर्व देशवासी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन करत आहेत. याच दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही ट्विट करून हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. मात्र त्याने अशा काही शब्दांत ट्विट केले आहे, ज्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

गौतम गंभीरने ट्विट केले की, ‘१९८३, २००७ आणि २०११ चा क्रिकेट विश्वचषक विजय विसरून जा. हे हॉकी पदक कोणत्याही विश्वचषकापेक्षा मोठे आहे.’

त्याचे हे ट्विट क्रिकेटप्रेमींना आवडलेले दिसत नाही. अनेकांनी क्रिकेट विश्वचषक विजयाला कमी लेखल्याने त्याच्यावर टीका केली आहे. तर ३ पैकी २ विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या चाहत्यांनीही त्याला धारेवर धरले आहे.

https://twitter.com/Akramwasim_/status/1423129504000606210?s=20

इतरांनीही दिल्या शुभेच्छा
गौतम गंभीर शिवाय इतर अनेक क्रिकेटपटूंनीही ट्विट करून भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. माजी सलामीवीर आणि गौतम गंभीरचा सहकारी खेळाडू वीरेंद्र सेहवागने देखील ट्विट केले की, ‘भारताने ३-१ ने पराभूत झाल्यानंतर कांस्य पदकसाठी सामना खेळला आणि जिंकले. ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये पहिले पदक मिळाले आहे. हे पाहून मजा आली.’

याशिवाय देशाचे विद्यमान राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही ट्विट करून भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट केले, ‘४१ वर्षानंतर हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय हॉकीमध्ये नवीन युगाची सुरुवात करेल आणि तरुणांना खेळात उत्कृष्ट आणि उत्कृष्ट होण्यासाठी प्रेरित करेल.’

असा झाला सामना
आजच्या सामन्यात सिमरनजीत सिंगने देशासाठी सर्वाधिक दोन गोल केले आहेत. त्याने १७ व्या आणि ३४ व्या मिनिटाला गोल केला. याच्या व्यतिरिक्त हार्दिक सिंगने २७ व्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने २९ व्या मिनिटाला आणि रुपिंदर पाल सिंगने ३१ व्या मिनिटाला संघासाठी प्रत्येकी एक गोल केला.

जर्मनीच्या संघाने एकूण चार गोल केले. यामध्ये तैमूर ओरुजने दुसऱ्या मिनिटाला निकलास वेलेनने २४ व्या मिनिटाला, बेनेडिक्ट फर्कने २५ व्या मिनिटाला आणि लुकास विंडफेडरने ४८ व्या मिनिटाला संघासाठी गोल केले. आर्ध्या वेळेपर्यंत दोन्ही संघ ३-३ अशी बरोबरीत होते. यानंतर भारतीय संघाने चांगली कामगिरी करत हा सामना आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक

भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना

‘कांस्य पदका’साठी जर्मनीशी भिडणार भारताचा हॉकी संघ, पाहा कधी आणि किती वाजता होणार लढत?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---