भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्मातून जात आहे. वनडे असो, टी20 असो किंवा कसोटी असो प्रत्येक क्रिकेट प्रकारात तो सपशेल फ्लॉप ठरताना दिसत आहे. सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 खेळली जात आहे. या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. त्याची कसोटी सरासरीही घसरत आहे. त्याने दिल्ली कसोटी सामन्यातील दोन डावात 17 आणि 1 धाव केली होती. त्यापूर्वी नागपूर कसोटी सामन्यात 20 धावांवर बाद झाला होता. त्याला खराब कामगिरीमुळे उपकर्णधारपदावरूनही हटवले आहे. अशातच आता राहुलला वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज इयान बिशप यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.
इयान बिशप (Ian Bishop) यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांनीदेखील खराब काळाचा सामना केला होता. सोशल मीडियावर ट्रोल केले गेले, तर त्यामुळे खेळाडूला दु:ख होईल. विशेष म्हणजे, हे प्रकरण तेव्हा तापले, जेव्हा आकाश चोप्रा आणि वेंकटेश प्रसाद (Aakash Chopra And Venkatesh Prasad) यांच्यामध्ये ट्विटरवर केएल राहुल (KL Rahul) याच्यावरून वाद पेटला होता. प्रसादने थेट म्हटले होते की, राहुलला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये घेतले नाही पाहिजे. कारण, त्याला बळजबरी संघात घेतले जात आहे. तसेच, आकाश चोप्राने वेंकटेशवर निशाणा साधत राहुलला पाठिंबा दिला. या प्रकरणात आता बिशप यांनीही उडी घेतली. बिशप म्हणाले की, मत मांडणे ठीक आहे, परंतु राहुलच्या प्रकरणावर अनेकांना हा वैयक्तिक मुद्दा बनवताना पाहणे चांगले नाहीये.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मला या वादावर कोणतेही भाष्य करायचे नाहीये. मला वाटते की, हा प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्याचा भाग आहे. मी एक खेळाडूच्या रूपात यामधून गेलो आहे. हे फक्त एवढेच आहे की, याला एक हजार पटीने वाढवले जात आहे. जसे काही देशांमध्ये होते. कारण, लोकसंख्येचा आकार खूप मोठा आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “बाहेरून पाहिल्यावर तुम्ही स्वत:बद्दल विचार करता. ठीक आहे, चर्चा करणे चांगले आहे, पण शेवटी तो एक माणूस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला ट्रोल होताना पाहणे सोपी गोष्ट नाहीये. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारात वाट शोधण्यास वेळ लागेल. मला त्या वैयक्तिक वादात पडायचे नाही. लोक जातायेत. असे झाले नाही पाहिजे.”
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिल्ली कसोटीनंतर केएल राहुल याला पाठिंबा दिला होता. मात्र, आता 1 मार्चपासून इंदोरमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत त्याला संघात जागा मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (indian opener batsman kl rahul on ian bishop border gavaskar trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधीच खराब फॉर्म, त्यात दुखापतीमुळे दौऱ्यातूनही बाहेर; वॉर्नरने इंस्टावर मनातलं सगळंच दु:ख टाकलं सांगून
‘बीसीसीआयने तुम्हाला समान मानधन दिले, तरीही तुम्ही…’, हमरनसेनेवर भडकल्या भारताच्या माजी कर्णधार