भारतीय संघाने बांगलादेश दोऱ्यातील पहिला सामना रविवारी (4 डिसेंबर) खेळला. उभय संघांतील हा एकदिवसीय सामना ढाकामध्ये खेळला गेला असून संघाचा उपकर्णधार केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. केएल राहुल अलिकडच्या काळात संघाचा नियमित सलामीवर बनला असला, तरी या सामन्यात त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात त्याने जो फॉर्म दाखवला, त्यावरून तो मध्यक्रमात देखील चांगले प्रदर्शन करू शकतो, ही गोष्ट सिद्ध झाली.
केएल राहुल (KL Rahul) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकूण 70 चेंडू खेळला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 4 षटकार निघाले आणि 73 धावा केल्याय. राहुल भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्याशिवाय एकही भारतीय फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकाल नाही. राहुलने या सामन्यात दाखवलेला फॉर्म पाहून चाहते त्याला सलामीऐवजी मध्यक्रमात फलंदाजीचा सल्ला देत आहेत.
चाहत्यांचा हा सल्ला कुठेच चुकीचाही दिसत नाही. कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलने सलामीच्या तुलनेत मध्यक्रमात चांगले प्रदर्शन केले आहे. मध्यक्रमात फलंदाजी करताना त्याची सरासरी 55.92 राहिली आहे. तर हीच सरासरी सलामीसाठी आलेल्या राहुसाठी 41.33 अशी राहिली आहे. राहुलच्या या आकडेवारीतत मोठी तफावत दिसून येते, ज्याचा संघाच्या एकंदरीत प्रदर्शनावर देखील परिणाम होत आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये केएल राहुलची सरासरी
वरच्या फळीत खेळताना – 41.33 सरासरी
मध्यक्रमात खेळताना – 55.92 सरासरी
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारततीय संघ प्रथम फलंदाजी करताना स्वस्तात गुंडाळला गेला. भारताने 41.2 षटकांमध्ये 186 धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ मात्र चांगली फलंदाजी करताना दिसला. दुसरीकडे बांगलादेशसाठी त्यांचा माजी कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने 10 षटकांमध्ये 36 धावा दिल्या आणि सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. शाकिबच्या साथीने इबादत हुसेन यानेही 47 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. (Indian opener KL Rahul’s stats in the middle order are amazing.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची गाडी रूळावर आली, दुसऱ्या स्थानी झेप घेतली; चेन्नईयनचा दारुण पराभव
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन