---Advertisement---

हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

On: गुरूवार, जुलै 22, 2021 3:33 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल गंभीर दुखापतग्रस्त असल्याचे समजले होते. ज्यामुळे त्याला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. त्याने भारतात आल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.

गिल काही दिवस आपल्या कुटुंबासोबत तो मोहालीमध्ये वेळ घालवणार आहे. त्यानंतर तो बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जाईल. तत्पूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये त्याने विमानतळाचा फोटो शेअर केला आहे.ज्यावर त्याने हृदय तोडल्याचा ईमोजी शेअर केला आहे. यावरून स्पष्ट आहे की, इंग्लंड दौऱ्यावरून बाहेर झाल्यामुळे गिल निराश झाला आहे.(Indian opener shubman gill returns home posts pictures on arrival)

Screengrab: Instagram/shubmangill

गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघाला मालिका जिंकून देण्याची मोलाची भूमिका बजावली होती. या कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत देखील त्याला संधी देण्यात आली होती. परंतु, या मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात देखील त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.

Screengrab: Instagram/shubmangill

पण असे असतानाही, त्याच्यावर विश्वास ठेवत निवड समीतीने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला या दौऱ्यातूनच दुर्दैवीरीत्या बाहेर व्हावे लागले आहे.

भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

शुबमन गिलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एकूण ८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३१.८ च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच ३ वनडे सामन्यांमध्ये त्याने १६.३ च्या सरासरीने ४९ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Video: थ्री इडियट्स सिनेमात कुणी काम केलंय; भारतीय क्रिकेटपटूंची उत्तरं ऐकून तुम्हीही म्हणालं, ‘भावांनो आता बास!’

खुशखबर! कोरोनाला धोबी पछाड देत रिषभ पंत टीम इंडियात दाखल; फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---