भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना विशाखापटनममध्ये खेळला गेला. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड या टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. पण मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने इशान किशनसोबत मिळून संघाला चांगली सुरुवात दिली. दोन्ही सालामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. या प्रदर्शनाच्या जोरावर या दोघांची नावे एका खास यादीत जोडली गेली आहेत.
भारतीय संघाने मंगळवारी (१४ जून) खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पहिल्या १० षटकांमध्ये संघाने १ विकेटच्या नुकसानावर ९७ धावा केल्या होत्या. अशात २० षटकांमध्ये संघाची धावसंख्या २०० पार जाईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु नंतरच्या १० षटकात संघाने ४ महत्वाच्या विकेट्स गमावल्या आणि यादरम्यान, धावा देखील कमी निघाल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर जोडी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले.
ऋतुराजने या सामन्यात ३५ चेंडूत ५७ धावा केल्या, यामध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे इशान किशनने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. टी२० क्रिकेटमध्ये ही ६ वी वेळ आहे, जेव्हा भारताच्या दोन्ही सालामीवीरांनी वैयक्तिक ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी देखील झाली.
एका टी२० सामन्यात प्रत्येकी ५०-५० धावांपेक्षा जास्त योगदान देणारी पहिली सालामीवीर जोडी भारताला २०२० मध्ये मिळाली होती. हा सामना श्रीलंकेविरुद्ध असून पुण्यामध्ये खेळला गेला होता. त्यानंतर २०२१ मध्ये इंग्लंड, नामिबिया आणि न्यूझीलंड या तीन सांघांविरुद्ध भारतीय सालामीवीरांनी प्रत्येकी ५० पेक्षा अधिक धावांचे योगदान दिले होते. आता २०२२ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध पुन्हा एकदा भारतीय सलामीवीर अशी कामगिरी करू शकले आहेत.
टी-२० सामन्यात प्रत्येकी ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारताच्या सलामीवीर जोड्या
केएल राहुल-शिखर धवन विरुद्ध श्रीलंका (२०२०, पुणे)
रोहित शर्मा – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (२०२१, अहमदाबाद)
केएल राहुल – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान (२०२१, आबू धाबी)
केएल राहुल – रोहित शर्मा विरुद्ध नामिबिया (२०२१, दुबई)
केएल राहुल – रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड (२०२१, रांची)
ऋतुराज गायकवाड – इशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२२, विझग)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्वा! वॉर्नरने झेप घेत एका हाताने टिपला अविस्मरणीय झेल, पाहा व्हिडिओ
‘यामुळे कार्तिकला टी२० विश्वचषकाच्या संघात घेणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाने वर्तवले भाकित
ऋतुराजचं नाणं खणखणीत वाजलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक केलं