मेरठ। सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला झालेल्या दुखापतीमुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग यांना कर्करोग आहे. मेरठनंतर दिल्लीत केलेल्या तपासणीत त्यांना ही माहिती मिळाली. त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते कर्करोग अद्याप पहिल्या टप्प्यात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार याचे कुटुंब मेरठच्या गंगानगरमध्ये राहते. त्याचे वडील किरणपाल सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच पोटदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीतही तपासणी केली. चाचणीमध्ये कर्करोगाची पुष्टी झाली. किरणपाल सिंह म्हणाले की, डॉक्टरांनी माझ्यावर केमोथेरपी केली आहे.
कोरोना आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. उपचारासाठी परदेशात जाण्याच्या शक्यतेला नाकारत किरणपाल म्हणाले की, “या क्षणी मला परदेशात जाण्याची गरज नाही. देशात चांगल्या वैद्यकीय संस्था आहेत आणि माझ्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.”
यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल2020 मध्ये खेळत असताना भुवनेश्वर जखमी झाला होता. चेन्नई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात डावाच्या शेवटच्या षटकात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. त्याने या हंगामात खेळलेल्या एकूण 4 सामन्यात 3 गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुखापतग्रस्त भुवनेश्वर आयपीएलमधून आऊट! हैदराबाद संघात कोणाची लागणार वर्णी? ‘ही’ ३ नावे चर्चेत
-भुवनेश्वर कुमारच्या जागी हैदराबाद संघात निवड झालेला कोण आहे पृथ्वी राज यारा, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?