भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज आणि बऱ्याच स्टार खेळाडूंनी सजलेल्या अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला. या एकतर्फी सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय साकारला. या विजयाचे हिरो रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ठरले. रोहितने बॅटमधून शतकी धमाका केला, तर बुमराहने सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. तरीही या प्रदर्शनामुळे तो खुश नाहीये. त्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देत यामागील कारण सांगितले.
या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 10 षटके गोलंदाजी करताना 39 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे अफगाणिस्तान संघ 272 धावाच करू शकला. हे विश्वचषकातील बुमराहचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन होते. सामना संपल्यानंतर बुमराहने आपल्या प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला बुमराह?
तो म्हणाला, “मी निकालावर जास्त लक्ष देत नाही. मी चार विकेट्स घेतल्या, याचा अर्थ असा होत नाही की, मी जास्त खुश आहे किंवा मी असामान्य गोष्ट केली आहे. मी फक्त माझ्या तयारीनुसार जातो. मला जी प्रक्रिया योग्य वाटते, मी त्यानुसार जातो. मी खेळपट्टी समजण्याचा प्रयत्न करतो. तसेच, त्यानुसार, कोणती रणनीती चांगली ठरू शकते, फक्त याचाच विचार करतो.”
‘आम्ही कोणत्याही संघासाठी खास तयारी करत नाहीये’
पुढे बोलताना बुमराह म्हणाला, “हे पाहा, प्रत्येक संघात फलंदाज आणि गोलंदाज असतील. आमच्याकडे फलंदाजही आहेत आणि गोलंदाजही आहेत. आम्ही कोणत्याही विशेष संघासाठी कोणतीही खास तयारी करत नाहीयेत. होय, आम्ही इतरांच्या तुलनेत स्वत:वर अधिक लक्ष देत आहोत. कारण, आम्हाला जाणवले आहे की, जर आम्ही आमच्या संघावर लक्ष दिले, तर आम्ही आमच्या ताकदीवर लक्ष दिले, तर इतर गोष्टी आपोआप होतात. त्यामुळे आम्ही आमचा संघ, आमच्या तयारीवर लक्ष देत आहोत.”
बुमराहची अखेरच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाज
अफगाणिस्तान संघाला आपल्या डावाच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता. कारण, पहिल्या 15 षटकात अफगाणिस्तान संघाने 3 विकेट्स गमावल्या होत्या. हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह उमरजाई यांनी 121 धावांची भागीदारी रचत अफगाणिस्तानचे सामन्यात पुनरागमन करून दिले. उमरजाई बाद झाल्यानंतर, शाहिदी खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने अफगाणिस्तानला 40 षटकात 200 धावांच्या पलीकडे पोहोचवले. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहच्या दमदार पुनरागमनानंतर विकेट्सची रांगच लागली. त्यामुळे अफगाणिस्तान संघ 50 षटकात 8 विकेट्स गमावत 272 धावाच करू शकला. त्यानंतर भारताने हे आव्हान 2 विकेट्स गमावत 35 षटकात पार केले. यामध्ये भारताकडून रोहित शर्मा (131) याने शतक, तर विराट कोहली (नाबाद 55) याने अर्धशतक साकारले. (indian pacer jasprit bumrah opens up on why he is not very happy after scalping 4 wickets against afghanistan in world cup 2023)
हेही वाचा-
भारताचा नादच खुळा! एकतर्फी विजयानंतर बदलून टाकल्या Points Tableच्या जागा, पाकिस्तानचं केलं मोठं नुकसान
रोहितच्या शतकामुळे बनले एकापेक्षा एक विश्वविक्रम, पण सामन्यानंतर हिटमॅन म्हणाला, ‘मला माझी एकाग्रता…’