पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.
या विजयात रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली. संपूर्ण दौरा अतिशय खराब फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला अखेर या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
परंतु या सामन्यात आधी रोहित आणि विरारमधील तर नंतर त्याच्यात आणि अजिंक्य रहाणेमध्ये झालेल्या संवादातील गोंधळामुळे विराट आणि रहाणेला आपली विकेट गमवावी लागली. परंतु यातून संघाला सहीसलामत रोहितने बाहेर काढले. एवढेच नाही तर चांगली धावसंख्या उभारून दिली.
रोहित फलंदाजीला मैदानावर असताना आजपर्यंत २७ वेळा तो किंवा त्याचा जोडीदार धावबाद झाला आहे. त्यात स्वतः रोहित १२ तर जोडीदार १५वेळा बाद झाला आहे. विराटकडून ही नकोशी अशी कामगिरी २६वेळा झाली असून विराट मैदानावर असताना स्वतः १२ तर जोडीदार १४वेळा धावबाद झाला आहे.
कोहली आणि विराट मैदानावर असताना ७ वेळा दोघातील एक खेळाडू धावबाद झाला आहे. त्यात विराट ५ तर रोहित २ वेळा धावबाद झाला आहे. जेव्हा विराट ५ वेळा धावबाद झाला आहे तेव्हा रोहितने ५७, २०९, २६४, १२४ आणि ११५ अशा मोठ्या खेळी केल्या आहेत.
भारतीय जोडीमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद व्हायचा विक्रम सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. १७६ वेळा एकत्र खेळताना ९ वेळा त्यांच्यातील कुणीतरी धावबाद झाला आहे. तर गांगुली आणि द्रविडमध्ये अशी नकोशी कामगिरी ८७पैकी ७वेळा झाली आहे.
रोहित आणि विराटने ६२ पैकी वनडेत एकत्र खेळताना ७ वेळा अशी कामगिरी केली आहे.