माजी क्रिकेटपटू पारस म्हांब्रे (paras mhambre) सध्या भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात खेलाडू चांगली कामगिरी करत आहेत. असे असले तरी, आता अशी माहिती समोर येत आहे की, भारतीय संघाच्या एका वरिष्ठ खेळाडूने संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी केली आहे. या खेळाडूच्या मते माजी दिग्गज अजित आगरकर (ajit agarkar) यांना भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुत्क केले पाहिजे.
पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये आयसीसीची सर्वात महत्वाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. अशात बीसीसीआय या आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने संघ तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. माहितीनुसार, या खेळाडूने गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी केली आहे. तो भारतीय संघाशी संबंधित निर्णय घेताना महत्वाची भूमिका पार पाडत असतो. आता या खेळाडूने संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हा खेळाडूने माजी दिग्गज अजित आगरकर यांना गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खेळाडूच्या मते किमान आगामी २०२३ विश्वचषकापर्यंत आगरकरांकडे ही जबाबदारी सोपवली गेली पाहिजे. सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे हे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जवळची व्यक्ती असल्याचे सांगितले जाते.
अजित आगरकर यांच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी १९९८ ते २००७ या दरम्यानच्या काळात भारतीय संघासाठी २८ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ४७.३७ च्या सरासरीने ५८ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीयमध्ये त्यांनी २७.८५ च्या सरासरीने २८८, तर टी-२० मध्ये २८.३३ च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी प्रशिक्षकाच्या चर्चेत येण्यापूर्वी मागच्या वर्षी अगरकरांचे नाव भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये नियुक्त होण्यासाठी चर्चेत होते. सध्या ते समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत.
दरम्यान, भारतीय संघाने नुकतेच वेस्ट इंडीज संघाला पाणी पाजले आहे. मायदेशात खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताने विंडीज संघाला क्लीन स्वीप (३-०) दिला. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात मायदेशातील टी-२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
व्याजासकट परतफेड! आईने दागिने गहाण ठेवून घेऊन दिली होती बॅट, मुलाने पदार्पणात त्रिशतक करत फेडलं कर्ज
ओदिशाला नमवून माजी विजेत्या बंगलोरने उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही राखले कायम!
भारताविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर एक दिवसही थांबले नाहीत पाहुणे, त्वरित परतले स्वदेशी