भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाचा आज (30 जुलै) रोजी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना आहे. पल्लेकेले या मैदानावर हा सामना रंगला आहे. तत्पूर्वी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा (Sanju Samson) फ्लॉप शो सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) पुन्हा एकदा निराश झाला आणि खातेही न उघडता तंबूत परतला. यावर आता भारतीय चाहते संजूची फिरकी घेत आहेत.
दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन गोल्डन डकचा बळी ठरला होता. तर तिसऱ्या टी20 सामन्यात त्याला 4 चेंडूंचा सामना करावा लागला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) शून्यावर बाद झाल्यानं चाहते संतापले आहेत. चाहत्यांनी आता संजू सॅमसनला (Sanju Samson) निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
Happy Retirement Sanju Samson #INDvsSL pic.twitter.com/s1oHmUpdfO
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) July 30, 2024
संजू सॅससन (Sanju Samson) चामिंडू विक्रमासिंघेच्या चेंडूवर बाद झाला. संजू श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या हातात झेलबाद झाला. खाते न उघडताच बाद झाल्यानंतर आता संजूच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या 30 डावांमध्ये 4 वेळा शून्यावर बाद होणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
टी20 आंतरराष्ट्रीयक क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय यष्टीरक्षक
रिषभ पंत- 4
संजू सॅमसन- 3
जितेश शर्मा- 1
केएल राहुल- 1
इशान किशन- 1
एमएस धोनी- 1
महत्त्वाच्या बातम्या-
30 देश, 715 दिवस, 22000 किमी सायकल प्रवास! नीरज चोप्राच्या जबरा फॅननं गाठलं पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : हाॅकीमध्ये भारतानं दिली सलग दुसरी विजयी सलामी…!
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत पराभव, टेनिस स्टार रोहन बोपण्णाची निवृत्तीची घोषणा