इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभाग घेत असतात. हे खेळाडू काही महिने ड्रेसिंग रूम आणि हॉटेलमध्ये एकत्र असतात. त्यामुळे या काळात त्यांची मैत्री घट्ट झालेली असते. दरम्यान, ते एकमेकांना टोपण नावाने देखील हाक मारत असतात. चला तर जाणून घेऊया आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंचे मजेशीर टोपण नाव.
१) एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. एमएस धोनीचे टोपण नावाने ‘माही’ असे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील ‘माही’ या टोपण नावाने ओळखले जाते.
२) चेतेश्वर पुजारा :
भारतीय कसोटी संघाचा धाकड फलंदाज चेतेश्वर पुजारा यंदा धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळतोय. २०२१ मध्ये झालेल्या लिलावात चेतेश्वर पुजाराला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. पुजाराला ‘पुज्जी’ आणि ‘चिंटू’ असे म्हणून हाक मारली जाते.
३)उमेश यादव :
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव सध्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याला ‘बबलू’ या टोपण नावाने हाक मारली जाते. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याला खेळायची संधी मिळाली नव्हती. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर नक्कीच त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी मिळू शकते.
४)शिखर धवन :
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत ‘गब्बर’ या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. अनेकदा शतक झळकावल्या नंतर किंवा झेल टिपल्यानंतर तो गब्बर स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसून येत असतो.
५)संजू सॅमसन :
भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडत आहे. मैदानावर आपल्या बॅटने लांब लांब षटकार मारणाऱ्या संजुला ‘चाचू’ या टोपण नावाने हाक मारली जाते.
६)अक्षर पटेल :
भारतीय संघातील आक्रमक अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. अक्षर पटेल मुळचा गुजरातचा असल्यामुळे त्याला ‘बापू’ या टोपण नावाने हाक मारली जाते.
७)हरभजन सिंग :
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केले आहे. दरम्यान, या स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तो गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘भज्जी’ या टोपण नावाने ओळखला जात आहे. तसेच युवा खेळाडू त्याला ‘भज्जू पा’ म्हणून हाक मारतात.
८)रवींद्र जडेजा :
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत ‘जड्डू’ या टोपण नावाने ओळखले जाते. त्याबरोबर त्याला ‘सर’ आणि ‘बापू’ या टोपणनावावेही बोलावले जाते.
९)अजिंक्य रहाणे :
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आयपीएल स्पर्धेत देखील ‘जिंक्स’ या टोपण नावाने हाक मारली जाते.(Indian players and their funny nicknames)
१०)रॉबिन उथप्पा :
गेली काही वर्ष कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा रॉबिन उथप्पा यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघात आहे. विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाला ‘रॉबी’ असे म्हणून देखील ओळखले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास ‘प्लेईंग इलेव्हन’
मायदेशात श्रीलंकेवर ओढावली व्हाईटवॉशची नामुष्की; दक्षिण आफ्रिकेने जिंकली ३-० ने टी२० मालिका