भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावद्दल सर्वांना चांगलेच माहित आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ मैदानावर असतात तेव्हा उत्साह शिगेला असतो. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या विश्वचषक 2023 च्या 12व्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. या शानदार सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते काही रंजक प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत.
स्टार स्पोर्ट्सने गुरुवारी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, सर्व खेळाडूंना प्रथम संघातील सर्वात शांत सदस्याचे नाव विचारण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना केएल राहुलने स्वतःचेच नाव घेतले. रवींद्र जडेजा हसत म्हणाला, या संघात कोणीही शांत नाही. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याही जडेजाशी सहमत असल्याचे दिसत होते. तर मोहम्मद सिराजने जसप्रीत बुमराहचे नाव घेतले. यानंतर प्रत्येकाला पार्टी करायला जास्त आवडणाऱ्या खेळाडूचे नाव विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना राहुल, कुलदीप, सिराज यांनी इशान किशनचे नाव सांगितले, तर जड्डूने इशान आणि शुभमन गिलची नावे सांगितली.
पुढील प्रश्नात या खेळाडूंना सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या खेळाडूचे नाव विचारण्यात आले. याला प्रत्युत्तर देताना यष्टिरक्षक फलंदाज राहुल म्हणाला, विराट कोहली. जडेजा म्हणाला, संघात 2-3 खेळाडू आहेत. जसे कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज. पांड्या आणि सिराजने रविचंद्रन अश्विनचे नाव घेतले. त्यानंतर पुढच्या प्रश्नात संघातील सर्वोत्तम कुकचे नाव देण्याची वेळ आली, तेव्हा राहुल म्हणाला, मला याबद्दल काहीच माहिती नाही. जडेजाने अंदाज लावत किंग कोहलीचे नाव घेतले आणि सिराजने त्याचा सहकारी गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव सांगितले.
यानंतर, प्रत्येकाला संघातील त्या व्यक्तीचे नाव घेण्यास सांगितले जो प्रेमाबाबत सर्वोत्तम सल्ला देईल. केएल राहुलने प्रत्युत्तर देताना प्रशिक्षक राहुल द्रविडचे नाव घेतले. जड्डूच्या मते, कर्णधार रोहित शर्मा. चायनामन कुलदीपने यासाठी सूर्यकुमार यादवची निवड केली. संघातील प्रँकिंगच्या बाबतीत विराट कोहली आणि इशान किशन यांची नावे घेतली गेली. त्यानंतर सर्वोत्कृष्ट डान्सरच्या नावाचा प्रश्न आला तेव्हा बहुतेक जनांनी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची नावे घेतली. (Indian players answered interesting questions, with Ishan Kishan and Virat Kohli leading the way)
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाजला दुहेरी मुकुट
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी